Midnight inferno at an illegal nightclub in Arpora, Goa — fire triggered by a cylinder blast causes massive destruction and multiple casualties Saam Tv
देश विदेश

Goa Nightclub Fire: गोव्याच्या नाईट क्लबमध्ये 'अग्नीतांडव' नाईट क्लबला आग कशी लागली?

Goa Nightclub Blaze Kills 25: गोव्यात मध्यरात्री नाईट क्लबला आग लागली... आणि पुन्हा एकदा बेकाय़देशीर नाईट क्लबचा आणि पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला... मात्र उत्तर गोव्यातील ही दुर्घटना कशी घडली? गोवा सरकारने काय पाऊल उचललंय?

Suprim Maskar

ही अंगावर काटा आणणारी दृश्य आहेत... उत्तर गोवातील अरपोरा गावात 6 डिसेंबरच्या मध्यरात्री नाईट क्लबला लागलेल्या आगीची...बागा समुद्रकिनारी या नाईट क्लबमध्ये मध्यरात्री डान्सचा आनंद घेण्यात सर्वच पर्य़टक मशगुल होते... नेमकं त्याचं वेळी क्लबच्या ग्राउंड फ्लोअरच्या किचन भागात सिलिंडरचा स्फोटचा झाला..आणि काही क्षणातच आगीनं रौद्ररूप धारण केलं.. आग स्टेजपर्यंत पोहचली आणि कलाकरांसह सगळ्यांचीच धावपळ उडाली...

दुसरीकडे क्लबला आग लागल्याची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचं पथकही घटनास्थळी दाखल झालं... मात्र त्याआधीचं सिलिंडर स्फोटामुळे क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं...क्लबला लागलेल्या आगीत दुर्देवाने 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. पहाटेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाला यश आलं... ज्यानंतर स्वयंपाकघर परिसरातून मृतदेह बाहेर काढण्यात आले.. त्यामुळे या आगीत हॉटेलमधील कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जातोय...

दरम्यान दुर्घटना ज्या नाईट क्लबमध्ये झाली तो क्लब बेकायदेशीर होता. 25 जणांची जाणिवपूर्वक हत्या करण्याचं काम गोवा सरकारनं केलयं, असा आरोप काँग्रेसनं केलाय... तर दुसरीकडे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी केली. क्लबच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आणि त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्याचे आदेश दिलेत....

गोवा हे नेहमीचं पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलयं.. त्यामुळे वर्षाकाठी लाखो पर्यटक उत्तर गोव्याला भेट देत असतात.. नाईट क्लब, हॉटेलची संख्याही गोव्यात लक्षणीय आहे.. त्यामुळे बेकायदेशीर हॉटेल आणि नाईट क्लबचा मुद्दा गोव्यात नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. या दुर्घटनेमुळे गोव्यातील पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय..

आता गोवा सरकार बेकायदेशीर आणि नियमाचं पालन न करणाऱ्या नाईट क्लबवर आणि हॉटेलवर कारवाई करणार का? आणि अशा बेकायदेशीर कामांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप मंत्र्याच्या मुलाचा माज, कारने अनेकांना उडवलं; नंतर जमलेल्या स्थानिक लोकांवर पिस्तुल ताणली

Iran vs US Tensions: खामेनेईंच्या टार्गेटवर सुन्नी देश, इराणचे खतरनाक चार प्लॅन

Crime News: दिप्तीनंतर आता कीर्ती! बाथरुममध्ये कोंडलं, बेदम मारलं; १०लाखांसाठी अमानुष छळ; आणखी एका विवाहितेनं संपवलं आयुष्य

चंद्रपूरचा महापौर भाजपचा की काँग्रेसचा? महापालिकेची सूत्रं 'मातोश्री'च्या हाती? VIDEO

Special Report : महायुतीत ठणाठणी! शिंदेसेनेचं भाजपच्या नाईकांना ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT