Drone attack on oil tanker MKD VYOM near Oman coast leaves one Indian sailor dead; rescue operations save remaining crew members. saam tv
देश विदेश

पश्चिम-आशियामधील युद्ध पेटणार! ओमानमध्ये तेल टँकरवर ड्रोन हल्ला, एका भारतीय व्यक्तीचा मृत्यू

Indian Sailor Killed in Drone Strike : पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षादरम्यान ओमानच्या मस्कट किनाऱ्याजवळ तेल टँकर MKD VYOM वर ड्रोन हल्ला झाला. यात एका भारतीय क्रू मेंबरचा मृत्यू झाला. जहाजावरील २१ क्रू मेंबर्समध्ये सोळा भारतीय होते.

Bharat Jadhav

  • ओमानच्या मस्कट किनाऱ्याजवळ तेल टँकरवर ड्रोन हल्ला झाला.

  • 21 क्रू मेंबर्सपैकी 16 भारतीय होते; एका भारतीयाचा मृत्यू झाला.

  • इंजिन रूममध्ये आग लागून स्फोट झाला.

पश्चिम-आशिया (मध्य पूर्व)मध्ये सुरू असलेल्या युद्धात एका भारतीयाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी ओमानमधील मार्शल आयलंडच्या ध्वजांकित तेल टँकर MKD VYOM वर बॉम्बने भरलेल्या ड्रोनने हल्ला केला. यात एका भारतीय खलाशीचा मृत्यू झाला आहे. ओमान वृत्तसंस्थेनुसार, हा हल्ला मस्कटच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर झाला. या हल्ल्यामुळे इंजिन रूममध्ये आग लागली आणि स्फोट झाला. जहाजमध्ये त्यावेळी २१ क्रू मेंबर्स होते. त्यापैकी १६ जण भारतीय होते. उर्वरित लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.

वृत्तानुसार, हा हल्ला स्ट्रेट ऑफ हॉर्मुज (समुद्रधुनी) च्या जवळ हल्ला झाला. हा जागतिक तेल व्यापारासाठी खूप महत्त्वाचा मार्ग आहे. पर्शियन आखाताकडे जाणारा अरुंद मार्ग महत्त्वाचा आहे. ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्राने सांगितले की, टँकरमध्ये अंदाजे ५९,४६३ मेट्रिक टन माल होता. हे जहाज मस्कटपासून सुमारे ५२ नॉटिकल मैल अंतरावर होते त्यावेळी हा हल्ला झाला. तेल टॅकरवर झालेल्या हल्लामुळे मध्य-पूर्व(पश्चिम -आशिया) चे युद्ध अजून पेटणार, असा अंदाज आहे.

इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले सुरू केलेत. इराणनेही अमेरिका आणि इस्रायलला चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ येणाऱ्या जहाजांना धमकी दिली होती. दरम्यान इराणने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून जवळपास ८ देशांवर हल्ले केले आहेत.

तेल टँकर वाहून नेणाऱ्या जहाजावर झालेल्या हल्ल्याचा संबंध इराण समर्थित सैन्याशी जोडला जात आहे. दरम्यान अद्याप कोणीही औपचारिकपणे जबाबदारी स्वीकारलेली नाही. या प्रदेशात यापूर्वीही सागरी हल्ले झाले आहेत, परंतु सध्याच्या संघर्षामुळे तणाव आणखी वाढला आहे. या हल्ल्यात भारतीय व्यक्तीचा मृत्यू हा अमेरिका-इराण संघर्षातला पहिला भारतीय बळी मानला जातोय.

हल्ल्यानंतर ओमानने जहाजातील कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा घटनांमुळे आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तेल पुरवठा साखळीवर परिणामही होण्याची शक्यता आहे.

या हल्ल्यामुळे प्रादेशिक अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे, कारण होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जगातील मोठ्या प्रमाणात तेलाची वाहतूक होते. इराण आणि पाश्चात्य देशांमधील वाढत्या तणावाचा परिणाम सागरी व्यापारावर होण्याची शक्यता आहे. ओमानसारख्या किनारी देशांना अशा घटनांना तोंड देण्यासाठी अतिरिक्त खबरदारी घेण्यास भाग पाडले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुरंदरमधील गराडे धरण 100 टक्के भरले

Thursday Horoscope: नात्यात गोडवा वाढेल; ५ राशींच्या व्यक्तींनी खर्च जपून करा; वाचा आजचे राशीभविष्य

गोमंतकीय वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंढरपुरात उभारणार 'गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन', मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबईत तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! उंदीर आणि माशांचा वावर दिसताच प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रीमचा परवाना रद्द

Motichoor Laddu Recipe: सण किंवा कार्यक्रमासाठी, घरच्या घरी बनवा हलवाईसारखे मऊ, रसाळ आणि स्वादिष्ट मोतीचूर लाडू

SCROLL FOR NEXT