Lok Sabha Election 2024 Saam Digital
देश विदेश

Lok Sabha Election 2024 : १९ एप्रिलला लोकसभेच्या निवडणुका, २२ मे रोजी निकाल? व्हायरल पोस्ट फेक असल्याचा निवडणूक आयोगाचा खुलासा

Sandeep Gawade

Lok Sabha Election 2024

देशात लोकसभा निवडणुका एप्रिल किंवा मे मध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आपापली रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. दरम्यान इंटरनेट आणि व्हॉट्सॲपवर एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यात 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुका 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान होतील असा दावा करण्यात आला आहे. मात्र यातील सत्यता तपासल्यानंतर ही पोस्ट बनावट असल्याचं समोर आलं आहे. निवडणूक आयोगानेच याबाबत खुलासा करताना असून 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नसून कोणतीरी खोडसाळपणा केल्याचं म्हटलं आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट व्हायरल होत आहे जी @BiharTeacherCan नावाच्या युजर हँडलवर शेअर केली गेली आहे. हा फोटो 14 फेब्रुवारी 2024 रोजी शेअर करण्यात आला होता. यावर शेअर केलेल्या वेळापत्रकानुसार, 18 व्या लोकसभेच्या निवडणुका १९ एप्रिल दरम्यान 7 टप्प्यात निवडणुका होतील होतील असे लिहिले आहे. पुढे, सर्व 7 टप्प्यांच्या तारखा देखील दिल्या आहेत. ज्यामध्ये पहिला टप्पा ११ एप्रिलला, दुसरा टप्पा १८ एप्रिलला, तिसरा टप्पा २३ एप्रिलला, चौथा टप्पा २९ एप्रिलला, पाचवा टप्पा ६ मे रोजी, 12 मे रोजी आणि सातव्या टप्प्यातील निवडणुका होतील आणि २२ मे ला निवडणुकांचा निकाल असल्याचं म्हटलं आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या व्हायरल मेसेजचे खंडन करत निवडणूक आयोगाने , लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या वेळापत्रकासंदर्भात एक बनावट संदेश व्हॉट्सॲपवर शेअर केला जात आहे. हा मेसेज बनावट आहे. ECI ने अद्याप कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही. निवडणुकीचे वेळापत्रक निवडणुक आयोग पत्रकार परिषद घेऊन जाहीर करतं.

निवडणुकीच्या तारखा २०१९ च्या

व्हायरल पोस्टमध्ये दाखवलेल्या निवडणुकीच्या तारखांची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी आम्ही या तारखांना लोकसभा निवडणुकीच्या कीवर्डच्या आधारे गुगल सर्च सुरू केले. याच दरम्यान एक बातमी समोर आली. या बातमीत 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सांगितले जात असलेल्या या तारखा प्रत्यक्षात 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या आहेत. व्हायरल होत असलेल्या पोस्टच्या तारखा आणि 2019 च्या निवडणुकीच्या वेळापत्रकाच्या तारखा पूर्णपणे जुळत होत्या. त्यामुळे व्हायरल पोस्टमध्ये नमूद करण्यात आलेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

Maharashtra News Live Updates: देशातील सर्वात भ्रष्ट परिवार म्हणजे काँग्रेसमधील शाही परिवार - मोदी

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेला मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार!

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT