Eight UDP MLAs join BJP in Meghalaya saam tv
देश विदेश

Politics: आणखी एका पक्षात फूट; 12 आमदारांपैकी 8 आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश, राजकीय वर्तुळात खळबळ

8 MLA Joins BJP : मेघालयात युडीपीच्या आठ आमदारांच्या भाजपमधील विलीनीकरणाला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिलीय. या घडामोडीनंतर ६० सदस्यांच्या मेघालय विधानसभेत भाजपचे संख्याबळ १० वर पोहोचलीय.

Bharat Jadhav

ईशान्येकडील मेघालय राज्यात भाजपची ताकद एका झटक्यात पाच पटीने वाढली आहे. मेघालय विधानसभेत याआधी भाजपचे दोन आमदार होते, परंतु आता ही संख्या १० वर पोहोचलीय. यामुळे राज्यातील युती सरकारमध्ये भाजप हा दुसरा सर्वात मोठा पक्ष बनलाय. विशेष म्हणजे, युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीचे (UDP) आठ आमदार भाजपमध्ये सामील झालेत. मेघालय विधानसभेच्या अध्यक्षांनी या ८ आमदारांच्या भाजपमधील प्रवेशाला (पक्षबदलाला) मान्यता दिलीय.

विधानसभेत आता भाजपचे १० आमदार

विधानसभा अध्यक्षाच्या निर्णयानंतर ६० सदस्यांच्या मेघालय विधानसभेत आता भारतीय जनता पक्षाचे १० आमदार झालेत. मेघालय विधानसभेचे अध्यक्ष थॉमस ए. संगमा यांनी, राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचीतील परिच्छेद ४ अन्वये, युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीच्या (यूडीपी) आठ आमदारांच्या भारतीय जनता पक्षाच्या विलीनीकरणाला मान्यता दिलीय.

यूडीपीची (UDP) ताकद १२ वरून ४ वर

यासह विधानसभेतील यूडीपी सदस्यांची संख्या १२ वरून ४ वर आलीय. तर भाजपची ताकद दोनवरून १० वर पोहोचलीय. या घडामोडीमुळे विधानसभेतील पक्षांच्या संख्याबळाचे समीकरण अधिकृतपणे बदलले असून, भाजपची उपस्थिती अधिक बळकट झाली आहे, तर यूडीपीकडे आता केवळ चार आमदार उरले आहेत.

या मान्यतेनंतर युडीपीमधून बाहेर पडलेले हे आठ आमदार आता मेघालय विधानसभेतील भाजप विधिमंडळ गटाचा भाग बनले आहेत. अशा प्रकरणांमध्ये मुख्य घटनात्मक प्रश्न हा असतो की, दहाव्या अनुसूचीतील विलीनीकरणाच्या तरतुदींनुसार अपात्रतेतून सूट मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या अटी पूर्ण झाल्या आहेत का नाही.

युडीपीचे आठ आमदार झाले भाजपवासी

मेघालय विधानसभेच्या सचिवालयाद्वारे जारी करण्यात आलेल्या एका अधिसूचनेत म्हटले आहे की, "यूडीपी (UDP) विधिमंडळ पक्षाच्या ८ सदस्यांचे—लाखमेन रिम्बुई, पायस मारवेन, कायर्मेन श्यल्ला, मायरालबॉर्न सिएम, मॅथ्यू बियॉन्डस्टार कुर्बाह, ओलान सिंग सुइन, बालाजीद कुपार सिनरेम आणि सिनशर कुपार रॉय लिंगडोह थाबाह—भाजपमध्ये झालेले विलीनीकरण, भारतीय राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचीतील परिच्छेद ४ अंतर्गत मान्य करण्यात आले आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Child Nutrition: मुलांचं पोट भरणं पुरेसं नाही, योग्य पोषणही महत्त्वाचं; डॉक्टरांनी सांगितलं पालकांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं?

Maharashtra News Live Update: नाशिकच्या मालेगाव तालुका परिसरात कोसळल्या पावसाच्या सरी

Caste Certificate: कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी किती खर्च येतो?

SRA कार्यालयात ऑनलाइन प्रवेशाचा खोळंबा; ओटीपीसाठी नागरिकांची प्रतीक्षा

Chanakya Niti : या ३ गोष्टींवर पैसा खर्च करताना कंजूषी करू नका, अन्यथा होईल मोठं नुकसान

SCROLL FOR NEXT