Meghalayas Governor Satyapal Malik's biggest criticism On PM Modi Saam TV
देश विदेश

Satyapal Malik: "कुत्रं मेलं तरी पत्र लिहिणारे मोदी..." - राज्यपालांची मोदींवर सर्वात मोठी टिका

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मेघालय, शिलॉंग: दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अनेकदा टिका झाली आहे. त्यानंतर केंद्राने हे तीन कृषी कायदे मागेही घेतले. पण, या वर्षभर चाललेल्या आंदोलनात अनेक शेतकरी मारले गेले होते, याबाबत आता मोदींवर (PM Modi) थेट राज्यपालांनीच टिका केली आहे. आपल्याच पक्षाच्या नेत्यानं मोदींवर जहरी टिका केल्यानं मोदींना घरचा आहेर मिळाला आहे. "कुत्रं मेलं तरी पत्र लिहिणारे मोदी, आंदोलनात ७०० शेतकरी मारले गेले तरी मोदी गप्प का?" असं म्हणत भाजप नेते तथा मेघालय राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक (Governor Satyapal Malik) यांनी पंतप्रधानांवर सडकून टिका केली आहे. (Change government at Centre in next polls, Meghalaya guv Satya Pal Malik urges farmers)

हे देखील पहा -

मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी थेट मोदींवरच काडाडून टिका केल्यामुळे ते भाजपवर नाराज आहेत काय अशा चर्चांना आता उधाण आलं आहे. एका कार्यक्रमात भाषणादरम्यान त्यांनी मोदींवर जाहिररीत्या टिका केल्याने भाजपची चांगलीच गोची झाली आहे. राज्यपाल सत्यपाल मलिक म्हणाले की, "कुत्रं मेलं तरी पत्र लिहिणारे मोदी, आंदोलनात ७०० शेतकरी मारले गेले तरी मोदी गप्प का?" असं म्हणत शेतकऱ्यांनी एकत्र यावं आणि २०२४ साली आपली सत्ता आणावी असं आवाहन त्यांनी एका भाषणादरम्यान केलं, हरियाणातल्या जिंदमध्ये ते बोलत होते.

यावेळी पुढे ते म्हणाले की, मला काही मित्रांनी सल्ला दिला की, जर तुम्ही चुप रहाल तर राष्ट्रपती किंवा उप-राष्ट्रपती बनाल. तेव्हा मलिक म्हणाले की, मी या पदांवर लाथ मारतो. राष्ट्रपती खूपच सन्मानीय व्यक्ती आहे. पण, चार महिन्यात त्यांना कुत्रंही विचारणार नाही, असं म्हणत त्यांनी नाव न घेता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही टोला लगावला आहे. तसेच ते म्हणाले की, या पदांचा काहिही अर्थ नसतो. मी पुर्ण उत्तर भारतात फिरेल आणि शेतकऱ्यांना सांगेन की, एक व्हा आणि दिल्लीवर आपलं राज्य आणा. कारण लोकं तुमच्याकडे लोकं मागण्यासाठी येतील, तुम्हाला कुठेही जावं लागणार नाही. हे आपल्याला भिकारी समजतात, हे आपल्याला किंमत देत नाही असंही मलिक म्हणाले.

याबाबत भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) म्हणाले की, सत्यपाल मलिक हे राज्यपाल आहेत. त्यांच्या विचारंचा भाजपच्या राजकारणाचा काहीही संबंध नाही. त्यांनी केलेली विधान वस्तुस्थितीला सोडून आहे. मोदींच्या राज्यात राज्यपाल हे मोदींचे पपेट्स नाही हे यावरुन सिद्ध होतं असा दावा भातखळकरांनी केला. तसेच भारतीय जनता पक्ष हा १००% लोकशाहीवादी पक्ष आहे. राज्यपालांनी पंतप्रधानांबाबत राजकीय वक्तव्य करु नये, मात्र राज्यपालांनी राजकीय वक्तव्य करुनही त्यांना पदावरून हटवलं नाही. कॉंग्रेसचं सरकार असतं तर त्यांना राज्यपालांना पदावरुव केव्हाच हटवल असतं असं म्हणत त्यांनी कॉंग्रेसवरच टिका केली.

तसेच याबाबत कॉंग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांना विचारलं असता ते म्हणाले की, देशामध्ये जी भावना आहे तीच भावना भाजप नेत्यांमध्येही आहे. भातखळकरांही असं वक्तव्य केलं होतं. या देशातील सरकार असंवेनशील आहे. शेतकरी आंदोलनात थंडी, वारा, ऊन, पावसात अनेक शेतकरी मारले गेले, असं असताना पंतप्रधान तिकडे गेले नाही. नोटबंदी, चुकीचं लॉकडाऊन, कोरोना काळतला ऑक्सिजनचा अभाव अशा अनेक घटनांवर मोदींनी दिलगिरी व्यक्त केली नाही. आता युक्रेनध्येही ऑपरेशन गंगाच्या बहाण्याचे मोदींच पीआर चालू आहे. या असंवेदनशीलतेबाबत भाजपच्या नेत्यांनाही सगळं दिसतं पण, भितीपोटी कुणी बोलत नाही, सत्यापाल मलिकांमध्ये ती हिंमत आहे म्हणून ते बोलतात असं सचिन सावंत म्हणाले.

Edited By- Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT