Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Actress Father shot: धर्मकोट विधानसभा मतदारसंघातील कोट इसे खान शहरात शुक्रवारी दोन तरुणांनी पंजाबी चित्रपट अभिनेत्री तानियाच्या वडिलांवर भरदिवसा गोळ्या झाडून पळ काढला.
Actress Father shot
Actress Father shotSaam Tv
Published On

Actress Father shot: धर्मकोट विधानसभा मतदारसंघातील कोट इसे खान शहरात शुक्रवारी दोन तरुणांनी पंजाबी चित्रपट अभिनेत्री तानियाच्या वडिलांवर भरदिवसा गोळ्या झाडून पळ काढला. डॉ. अनिलजीत कंबोज यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

पोलिस स्टेशनपासून सुमारे ५०० मीटर अंतरावर असलेल्या हरबन्स नर्सिंग होममध्ये घडलेल्या या घटनेनंतर परिसरात भयपूर्ण वातावरण आहे. नर्सिंग होममध्ये बसवलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली आहे.

Actress Father shot
Metro In Dino Cast Fees: रोमँटिक म्युझिकल ड्रामा 'मेट्रो इन डिनो' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे आणि आरोपींचा शोध सुरू केला आहे. एसएसपी अजय गांधी यांनी सांगितले की, सकाळी ११ वाजता डॉ. अनिलजीत कंबोज त्यांच्या हरबन्स नर्सिंग होमच्या केबिनमध्ये बसले होते.

Actress Father shot
Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

यादरम्यान दोन तरुण पोटदुखीचे औषध घेण्याच्या कारणांनी आले. औषध घेतल्यानंतर दोघेही तेथून निघून गेले. सुमारे ११:३० वाजता दोघेही पुन्हा एकदा नर्सिंग होममध्ये पोहोचले आणि पोहोचताच त्यांनी डॉ. अनिलजीतवर गोळीबार केला. दोन गोळ्या लागल्याने डॉ. अनिलजीत तिथेच पडले. यानंतर दोघेही तेथून पळून गेले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com