रशिया-युक्रेनमध्ये (Russia) बाराव्या दिवशीही युध्द सुरुच आहे. रशियाने हल्ले वाढवलेतं. बारा दिवसात रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांवर हल्ले केले आहेत. खर्किवच्या अनेक रहीवासी भागांवर हल्ले करुन इमारती उध्दस्त केल्या आहेत. दरम्यान आज या दोन्ही देशात पुन्हा तिसऱ्यांदा चर्चा होणार आहे.
या अगोदर झालेल्या चर्चेत सुरक्षित कॉरिडॉरवर एकमत झाले होते. आज होणाऱ्या चर्चेत युद्धविरामावर चर्चा होऊ शकते. आज युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमिर झेलेन्स्की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी (Pm Narendra Modi) चर्चा करणार आहेत. ही चर्चा फोनद्वारे होणार आहे.
रशियावर लावलेले निर्बंध हे रशियाला थांवण्यासाठी पुरेसे नाहीत' अस युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zhelensky) यांनी म्हटले आहे. याअगोदर युक्रेनने G-7 देश आणि युरोपियन युनियनला पत्र पाठवले आहे.यात युक्रेनकडून रशियावर अपेक्षित असलेल्या निर्बंधांच्या यादीचा समावेश केला असल्याच म्हटलं आहे.
गोळीबीरात जखमी झालेला विद्यार्थी भारतात परतणार
काही दिवसांपूर्वी युक्रेनच्या कीव शहरात सैनिकांनी केलेल्या गोळीबारात एक भारतीय विद्यार्थी हरजोत सिंह जखमी झाला होता. हा विद्यार्थी आता भारतात परतणार आहे. हरजोतचा पासपोर्टही हरवला आहे.मंगळवारी तो भारतात परतणार आहे. अशी माहिती केंद्रीय मंत्री जनरल व्हीके सिंह यांनी ट्विट (Tweet) करुन दिली आहे. भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून (Ukraine) बाहेर काढण्यासाठी भारत सरकार अनेक प्रयत्न करत आहे.
Edited by- Santosh Kanmuse
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.