अजबच! अमेरिकेतील महिलेचा सर्वात मोठे तोंड उघडल्याचा वर्ल्ड रेकॉर्ड twitter/ @Guinness World Records
देश विदेश

अजबच! अमेरिकेतील महिलेचा सर्वात मोठे तोंड उघडल्याचा वर्ल्ड रेकॉर्ड

जगात कोण काय करेल हे काही सांगता येत नाही. अमेरिकेच्या एका महिलेनं जगातील सर्वात मोठे तोंड उघडल्याचा वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वॉशिंगटन : जगात कोण काय करेल हे काही सांगता येत नाही. अमेरिकेच्या एका महिलेनं जगातील सर्वात मोठे तोंड उघडल्याचा (largest mouth gape - female) वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Records) बनवला आहे. टिकटॉक स्टार (tiktok star) असलेली सामंथा राम्सडेल (Samantha Ramsdell) ही ३१ वर्षीय महिला जगातील सर्वात मोठे तोंड उघडणारी महिला बनली असून तिने गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलं आहे.

सामंथा राम्सडेल या महीलेच्या तोंडातील कॅपॅसिटीव्ह गॅप ६.५२ सेमी म्हणजेच २.५६ इंच एवढा आहे. आपल्या शरीराचं काहीतरी वेगळेपण असल्याने काही लोकांनी मला गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सहभागी होण्याचा सल्ला दिला असल्याचं तिने सांगितलं. सामंथाचे टिकटॉकवर १० लाखांपेक्षा जास्त फॉलोवर्स असून अन्य सोशल मीडियावरही ती प्रसिद्ध आहे.

हे देखील पहा -

सामंथाला स्वतःलाच याबद्दल माहीत नव्हतं. तिने साउथ नॉरवॉकमधील दंत चिकित्सक डॉ एल्के चेउंग यांची भेट घेतली. त्यांनी गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमधील अधिकाऱ्यांना संपर्क केला साधला. त्यानंतर डॉ. चेउंग यांनी डिजिटल कॉलिपर्स वापरुन तिच्या दोन्ही ओठांमधील अंतर मोजलं, तेव्ह २.५६ एवढं अंतर आलं आणि हा एक वर्ल्ड रेकॉर्ड असल्याचं सिद्ध झालं.

याबाबत सामंथा म्हणते, आपल्याला आपल्या शरीरावर गर्व असला पाहिजे आणि शरीरालाच सर्वात मोठी संपत्ती मानलं पाहिजे. आपलं शरीर हीच आपली महाशक्ती आहे जी आपल्याला इतरांपेक्षा वेगळं बनवते. पुढे ती म्हणते माझ्या वयानुसार असा वर्ल्ड रेकॉर्ड बनवनं माझ्यासाठी सुरक्षित नव्हतं. पण, हा एक चांगला वर्ल्ड रेकॉर्ड होता. माझ्याबद्दल ही सर्वात मोठी आणि चांगली गोष्ट आहे. मी कधीच विचार केला नव्हता की, माझ्या तोंडामुळे मला प्रसिद्धी मिळेल. माझ्यासाठी हे अविश्वसनीय आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

Maharashtra Live News Update : विठू नामाच्या जयघोषात धाकटी पंढरी दुमदुमली

Laxman Hake News : अजित पवारांची माफी मागावी अन्यथा...; लक्ष्मण हाके यांना कायदेशीर नोटीस, अडचणी वाढणार

Shraddha kapoor: श्रद्धा कपूरचा ऑफ-शोल्डर ग्लॅमरस लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT