Meerut Vande Bharat Express News saam tv
देश विदेश

Meerut Vande Bharat Express News : वंदे भारत एक्स्प्रेसच्या धडकेत पत्नीसह २ मुलींचा मृत्यू; पतीच्या डोळ्यांसमोर दुर्दैवी घटना

Meerut News : वंदे भारत एक्स्प्रेसच्या धडकेत एकाच कुटुंबातील तीन जण ठार झाले. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये ही घटना घडली.

Nandkumar Joshi

Meerut News :

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसच्या धडकेत एकाच कुटुंबातील तीन जण ठार झाले. पतीच्या डोळ्यांसमोरच पत्नी आणि दोन मुलींचा मृत्यू झाला. रेल्वेचे फाटक बंद असताना रूळ ओलांडण्याच्या नादात ही दुर्दैवी घटना घडली.

कंकरखेडा विभागातील कासमपूर रेल्वे फाटकाजवळ ही दुर्घटना घडली. दिल्लीहून सहारनपूरकडे वंदे भारत एक्स्प्रेस जात होती. कासमपूर फाटकावर नरेश हा आपल्या कुटुंबासह रेल्वे रूळ ओलांडत होता. त्याचवेळी वंदे भारत एक्स्प्रेसची त्यांना धडक लागली. यात महिलेसह तिच्या दोन मुलींचा मृत्यू झाला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मोना असं मृत महिलेचे नाव आहे. तर चारू आणि इशिका अशी मुलींची नावे आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. पोलीस आणि लोहमार्ग पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी लोकांच्या मदतीने रेल्वे रुळांवरून त्यांचे मृतदेह उचलले. ते शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.

या दुर्घटनेची चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. महिला आणि तिच्या दोन मुलींचा वंदे भारत एक्स्प्रेसच्या धडकेत मृत्यू झाला. एक्स्प्रेस येणार असल्याने रेल्वे फाटक बंद होते. तिघेही फाटकातून रेल्वे रूळ ओलांडून जात होते. त्याचवेळी एक्स्प्रेस आली आणि ही दुर्घटना घडली. या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढणार? राज ठाकरेंवरील विधानामुळे कोर्टाचे चौकशीचे आदेश|VIDEO

Face Care: चेहऱ्यावरील ड्रायनेस किंवा पिंपल्स कमी करायचं आहेत? तर 'हा' घरगुती फेसमास्क आठवड्यातून १ वेळा नक्की ट्राय करा

Maharashtra Tourism : हिवाळ्यात फिरायला जायचंय? महाराष्ट्रातील 'हे' हिल स्टेशन सर्वात बेस्ट

एनडीए की महाआघाडी, बिहारमध्ये यंदा कुणाची सत्ता? एक्झिट पोलमधून धक्कादायक अंदाज समोर, VIDEO

Maria Theresa : युरोपातील सर्वात पहिली महिला राणी, जिनं तब्बल ४ दशकं शासन केलं, जाणून घ्या इतिहास

SCROLL FOR NEXT