Medha Patkar Saam Tv
देश विदेश

Medha Patkar: मेधा पाटकरांना अटक, नेमकं प्रकरण काय?

Medha Patkar Arrested By Delhi Police: सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली. कोर्टाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यानंतर शुक्रवारी त्यांना अटक करण्यात आली.

Priya More

नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली. त्यांना निजामुद्दीन येथून अटक करण्यात आली. एका मानहानी प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने मेधा पाटकर यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. आज दुपारी त्यांना साकेत न्यायालयात हजर केले जाईल.

२००१ मध्ये दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी मेधा पाटकर यांच्याविरोधात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणात मेधा पाटकर या दोषी ठरवल्यानंतर त्यांच्याविरोधात अटकेची ही कारवाई करण्यात आली. अटकेनंतर मेधा पाटकर यांना दिल्लीतील न्यायालयात हजर केले जाणार आहे.

साकेत न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश विशाल सिंग यांनी सांगितले की, 'मेधा पाटकर न्यायालयात हजर राहत नव्हत्या आणि त्यांनी जाणूनबुजून शिक्षेशी संबंधित आदेशाचे पालन केले नाही.' न्यायालयाच्या आदेशानंतर मेधा पाटकर यांना शुक्रवारी सकाळी अटक करण्यात आली. न्यायाधीशांनी सांगितले की, 'मेधा पाटकर यांचा हेतू स्पष्टपणे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणे आणि सुनावणी टाळणे हा होता. शिक्षेवर स्थगिती आदेश नसल्याने मेधा पाटकर यांना हजर करण्यासाठी दबाव आणणे आता आवश्यक झाले आहे असे न्यायालयाने म्हटले आहे.'

न्यायालयाने आदेशात म्हटले होते की, 'दोषी मेधा पाटकर यांच्याविरुद्ध पुढील तारखेसाठी दिल्ली पोलिस आयुक्त कार्यालयामार्फत अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात यावे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ मे रोजी होईल. पुढील सुनावणीत मेधा पाटकर यांनी शिक्षेच्या आदेशाचे पालन केले नाही तर न्यायालयाला आधी दिलेल्या 'सौम्य शिक्षे'चा पुनर्विचार करावा लागेल आणि शिक्षा बदलता येईल.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : “तुझा रेट काय?” बस स्टॉपजवळ उभ्या असलेल्या मुलीशी असभ्य वर्तन, शिवसैनिकांनी दिला चोप; मुंबईतील धक्कादायक प्रकार

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री शपथग्रहण सोहळ्यात पोहचले, थोड्याचवेळात घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

अमेरिकेनं दिले एलियन्सचे पुरावे, पेंटागॉनचा धक्कादायक अहवाल

Matkichi Usal Recipe: 'मदर्स डे' निमित्त नाश्त्याला बनवा झणझणीत मटकीची उसळ, सर्वजण पोट भरेपर्यत खातील

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो..₹१५०० बंद झाले का? योजनेत तुमचं नाव आहे का? एका क्लिकवर असं तपासा स्टेट्स

SCROLL FOR NEXT