Medha Patkar : मेधा पाटकर यांना मोठा झटका; २० वर्ष जुन्या प्रकरणात ठरल्या दोषी; काय आहे नेमकं प्रकरण?

Medha Patkar Latest news : नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर या एका जुन्या प्रकरणात दोषी सिद्ध झाल्या आहेत. यामुळे मेधा पाटकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मेधा पाटकर यांना मोठा झटका; २० वर्ष जुन्या प्रकरणात ठरल्या दोषी; काय आहे नेमकं प्रकरण?
Medha PatkarSaam Digital

नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर या एका जुन्या प्रकरणात दोषी सिद्ध झाल्या आहेत. दिल्लीच्या उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात पाटकर यांच्याविरोधात आरोप सिद्ध झाले आहेत. यामुळे मेधा पाटकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, मेधा पाटकर यांच्या विरोधात २० वर्ष जुन्या प्रकरणात आरोप सिद्ध झाला. त्यामुळे त्या दोषी ठरल्या. पाटकर आणि दिल्लीचे वीके सक्सेना यांच्यातील हे मानहानीचं जुनं प्रकरण आहे. २००३ सालापासून हे प्रकरण सुरु आहे. मेधा पाटकर यांचं नर्मदा वाचवा आंदोलन सुरु असताना त्यांच्या विरोधात मानहानीचा गुन्हा नोंद झाला. मेधा पाटकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना विनय कुमार सक्सेना यांच्या विरोधात आरोप केले होते.

मेधा पाटकर यांना मोठा झटका; २० वर्ष जुन्या प्रकरणात ठरल्या दोषी; काय आहे नेमकं प्रकरण?
Ashneer Grover: आधी ८० कोटी जमा करा, मग अमेरिकेला जा; न्यायालयाचा अश्नीर ग्रोव्हर आणि त्याच्या पत्नीला मोठा दणका

पाटकर यांनी केले होते गंभीर आरोप

एका टीव्ही चॅनलवर पॅनलवर चर्चा करताना मेधा पाटकर यांनी आरोप केले होते. वीके सक्सेना यांना गुजरातच्या सरदार सरोवर निगमकडून सिव्हिल कंत्राट मिळाल्याचा आरोप मेधा पाटकर यांनी केला होता. त्यानंतर सक्सेना यांनी सर्व आरोप फेटाळले होते. या आरोपानंतर सरदार सरोवर निगम लिमिटेडने गुजरात पोलिसांना पत्र लिहून आरोप फेटाळले होते.

मेधा पाटकर यांना मोठा झटका; २० वर्ष जुन्या प्रकरणात ठरल्या दोषी; काय आहे नेमकं प्रकरण?
Bakra Eid 2024 : 7 लाख 50 हजार रुपयांचा बोकड बघा! अवघ्या 2 वर्षांचा, वजन 161 किलो, VIDEO

निगम लिमिटेडने पत्रात म्हटलं होतं की, सक्सेना यांनी कधीही सिव्हिल कंत्राटासाठी सक्सेना यांनी विनंती केली नाही. निगमनेही त्यांच्या एनजीओलाही कोणत्याही प्रकारचं कंत्राट दिलं नाही'.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, साकेत न्यायालयाच्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट राघव शर्मा यांनी मेधा पाटकर यांना मानहानी प्रकरणात दोषी मानलं आहे. त्यांना कायद्याने दोन वर्षांची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पाटकर यांनी नर्मदा बचाव आंदोलन आणि स्वतः विरुद्ध जाहिरात प्रसिद्ध केल्याप्रकरणी सक्सेना यांच्याविरुद्ध खटला दाखल केला होता. त्या प्रकरणात सक्सेना यांना डरपोक, देशप्रेम नसलेला म्हटलं होतं. त्यांच्यावर हवाला रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप पाटकर यांनी केला होता. हा आरोप मानहानी करणारा असून नकारात्मक विचार वाढवण्यासाठी केलेले होते, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com