Ashneer Grover: आधी ८० कोटी जमा करा, मग अमेरिकेला जा; न्यायालयाचा अश्नीर ग्रोव्हर आणि त्याच्या पत्नीला मोठा दणका

Delhi HC Directs Ashneer Grover: भारत-पे चे सहसंस्थापक अश्नीर ग्रोवर आणि त्यांच्या पत्नीला न्यायालयाने दणका दिलाय. अमेरिका दौरा करण्यापूर्वी त्यांना ८० कोटी रूपये जमा करण्यास सांगितलं आहे.
अश्नीर ग्रोवर
Ashneer GroverSaam Tv

दिल्ली उच्च न्यायालयाने फिनटेक कंपनी भारत-पे चे सहसंस्थापक अश्नीर ग्रोव्हर आणि त्यांची पत्नी माधुरी जैन ग्रोव्हर यांना मोठा दणका दिला आहे. अमेरिका दौरा सुरू करण्यापूर्वी सुरक्षा म्हणजेच गॅरंटी म्हणून त्यांना ८० कोटी (Ashneer Grover) रुपये जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. २४ मे रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयानं सांगितलं की, सुरक्षा ही मालमत्तेच्या स्वरूपात असली पाहिजे.

यासोबतच त्यांना यूएई ट्रिप थांबवण्यासाठी अमिराती कार्डही सरेंडर करावं लागेल. न्यायालयाने दिलेल्या माहितीनुसार अश्नीर ग्रोव्हर आणि त्याच्या पत्नीकडे 'गोल्डन व्हिसा' सारखं अमिराती कार्ड आहे. ते यूएईमध्ये परदेशी नागरिकांसाठी १० वर्षांचा निवास परवाना आहे. अशा परिस्थितीत त्यांना अमिराती कार्ड (Delhi HC) न्यायालयात जमा करावं लागेल. दिल्ली उच्च न्यायालयाने अश्नीर ग्रोव्हरच्या प्रवासाबाबत इकॉनॉमिक ऑफिस विंगकडून माहिती मागवली होती. त्यामध्ये अशनीर ग्रोव्हरला मुलांसाठी उन्हाळी शाळेसाठी अमेरिकेला जायचं असल्याचं समोर आलं आहे.

न्यायालयाने अश्नीर ग्रोव्हरला अमेरिकेला जाण्याची परवानगी दिली आहे. परंतु त्यांना त्यांचे राहण्याचं ठिकाण, हॉटेल, प्रवास योजना आणि फोन नंबर न्यायालयाला द्यावा लागेल, असे निर्देश दिले आहेत. याशिवाय त्यांना (court news) त्यांची सर्व माहिती तपास यंत्रणांना द्यावी लागणार आहे. अश्नीर ग्रोव्हर २६ मे रोजी अमेरिकेला रवाना होणार आहे. परंतु ते १४ जून रोजी भारतात परतणार आहे. त्यांची पत्नी माधुरी जैन १५ जून रोजी अमेरिकेला जाणार आहे, ती १ जुलै रोजी भारतात परतणार आहे.

अश्नीर ग्रोवर
UPI Payment: सरकार UPI बाबत मोठा निर्णय घेणार? Google Pay आणि PhonePe कंपन्यांचं टेन्शन वाढलं

या दोघांवर फिनटेक कंपनी भारत-पेसोबत (Bharat Pay) सुमारे ८१ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेने या दोघांना परदेशात जाऊ देऊ नये, असं सांगितलं होतं. आर्थिक गुन्हे शाखेने अश्नीर ग्रोव्हर आणि त्याच्या पत्नीचीही परदेशात मालमत्ता असल्याचं म्हटलं होतं. भारत-पे सोडलेल्या अश्नीर ग्रोव्हरने जवळपास ५१ कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांची सध्या एकूण संपत्ती ९०० कोटी रुपये आहे. अश्नीर ग्रोव्हर शार्क टँक इंडियाचे जज देखील राहिले आहे.

अश्नीर ग्रोवर
Kalyan Crime News: चाकूचा धाक दाखवून Google Pay मधून उकळले १२हजार रुपये; क्राईम ब्रँचने गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com