MAYAWATI EXPELS FORMER MINISTER ANTU MISHRA FROM BSP; MAJOR ACTION saam tv
देश विदेश

माजी मंत्र्याची पक्षातून हकालपट्टी; पक्षप्रमुखांची मोठी कारवाई; इतर नेत्यांमध्ये खळबळ

Mayawati Expels Former Cabinet Minister Antu Mishra From BSP: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मायावती यांनी मोठी कारवाई केली आहे. सतीश चंद्र मिश्रा यांचे निकटवर्तीय आणि माजी कॅबिनेट मंत्री अंटू मिश्रा यांची पक्षविरोधी कारवायांच्या आरोपावरून बसपातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Omkar Sonawane

उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच दरम्यान बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी मोठी कारवाई केली आहे. सतीश चंद्र मिश्रा यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे माजी कॅबिनेट मंत्री अनंत कुमार मिश्रा उर्फ आंटु मिश्रा यांची बसपातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मायावती यांनी गुरुवारी अंटू मिश्रा यांच्यावर पक्षाविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप करत त्यांना तात्काळ पक्षातून काढण्यात येते अशी माहिती मायावती यांनी ट्विट करून दिली.

अंटू मिश्रा हे मायावती यांच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री होते. ते बसपाचे राष्ट्रीय महासचिव सतीश चंद्र मिश्रा यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. अंटू मिश्रा हे कानपूरमधील महाराजपूर विधानसभा मतदारसंघातून 2027 ची विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत होते, अशी माहिती आहे.

बसपाकडून अंटू मिश्रा यांच्यावर गंभीर आरोप

बसपाच्या केंद्रीय कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात अंटू मिश्रा हे अनेक वर्षांपासून पक्षाविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे म्हटले आहे. पक्षाचे नेतृत्वाने ही बाब शिस्तभगाची सांगात त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली आहे.

अंटू मिश्रा हे सतीश चंद्र यांच्या जवळचे मानले जातात. सतीश मिश्रा यांनीच त्यांना बसपामध्ये आणले होते. 2007 मध्ये बसपाने अंटू मिश्रा यांना फर्रुखाबाद विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्यांना मायावती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री करण्यात आले होते.

उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आलेला असतानाच अंटू मिश्रा यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. मायावती यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना निवडणुकीदरम्यान विरोधी पक्षांच्या हालचालींपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आमदार प्रसाद लाड अंतरवाली सराटीत दाखल

Health Tips : जेवणासोबत कच्चा कांदा आणि लसूण खाण्याचे ७ जबरदस्त फायदे

पुण्यातील विद्यानंद बापटनंतर आता 'एनर्जीमॅन' कामत काकांची चर्चा, गणेशोत्सव, डीजेवर नॉनस्टॉप बोलले!

Coffee Intake: कॉफीशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही? मग जाणून घ्या दिवसाला किती कप कॉफी प्यावी

Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

SCROLL FOR NEXT