Bulli Bai Case Saam Tv
देश विदेश

Bulli Bai Case: 'बुली बाई' अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत; दिल्ली पोलिसांची कारवाई

बुली बाई अ‍ॅप प्रकरणाचा कसून तपास सायबर पोलीस करत आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने बुल्ली बाई अॅप प्रकरणात मुख्य निर्मात्याला आसाममधून अटक केली आहे.

वृत्तसंस्था

आसाम : बुली बाई अ‍ॅप प्रकरणाचा कसून तपास सायबर पोलीस करत होती. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने बुल्ली बाई अॅप प्रकरणात मुख्य निर्मात्याला आसाममधून अटक केली आहे. पोलिसांनी कोटद्वारच्या शिब्बूनगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाला त्याच्या घरातून पकडले आहे. याआधी या प्रकरणात पोलिसांनी एक महिला आणि दोन पुरुषांना अटक केली होती. यातील एक आरोपी उत्तराखंड (Uttarakhand) आणि एक बंगळुरू (Bengaluru) येथून पकडला आहे.

मुख्य संशयिताचे नाव निरज बिश्नोई असे आहे. जोरहाट, आसाम, डीसीपी (स्पेशल सेल) केपीएस मल्होत्रा ​​यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्याला आसाममधून पकडले आहे, असे एका सूत्राने सांगितले आहे.

दरम्यान, बुली बाई हे एक असे अ‍ॅप होते ज्यावरून समाजातील मुस्लीम महिलांचे फोटो ऑनलाईन शेअर केले जात होते आणि त्याद्वारे मुस्लिम महिलांची बदनामी केली जात होती. पोलिसांनी असाही दावा केला आहे की, आरोपींनी त्यांच्या ट्विटर हँडलमध्ये शीख समुदायाशी संबंधित नावांचा वापर करत असत आणि लोकांची दिशाभूल करत होते.

सायबर पोलिसांनी आत्तापर्यंत बुली बाई प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. ते चार आरोपींची नावे-

  1. उत्तराखंडमधील मयंक रावल (21),

  2. आसाममधून निरज बिश्नोई (20)

  3. श्वेता सिंह

  4. अभियांत्रिकीचा विद्यार्थी विशाल कुमार झा (21)

वृत्तानुसार, उत्तराखंडमध्ये अटक केलेल्या दोन आरोपींना मुंबई पोलिसांनी मुंबईत आणले आहे. मयंक रावल आणि श्वेता सिंह या दोन्ही आरोपी वांद्रे येथील तुरुंगात आहेत. त्यांची सायबर क्राईम ब्रांचकडून (Cyber Crime Branch) चौकशी करण्यात येणार आहे. त्यानंतर या दोन्ही आरोपींना सुनावणीसाठी वांद्रे न्यायालयात (Court) हजर करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha : भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी केली काळी दिवाळी; सरकारचा निषेध करत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मविआचे धरणे

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

Gauri Nalawade Photos: कानात झुमके अन् गुलाबी साडी... अभिनेत्री गौरी नलावडेचं सौंदर्य, लेटेस्ट फोटो पाहा

Reliance Diwali Offer : रिलायन्स डिजिटलची फेस्टिव्हल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ऑफर; मोफत गिफ्ट्स आणि मोठ्या सवलती!

Sanjay Raut : राष्ट्रवादीचे ४ माजी आमदार भाजपच्या वाटेवर, संजय राऊतांनी शब्दाचे फटाके फोडले; म्हणाले, अजित पवार...

SCROLL FOR NEXT