Delhi Fire News Twitter/@ANI
देश विदेश

दिल्लीच्या गफ्फार मार्केटला भीषण आग, अग्निशमन दलाच्या ३९ गाड्या घटनास्थळी

दिल्ली पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहे.

वृत्तसंस्था

दिल्ली - एकीकडे कडक उन्हामुळे लोक त्रस्त आहेत. तर दुसरीकडे दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत आगीच्या घटना समोर येत आहेत. दिल्लीतील (Delhi) करोलबागच्या गफ्फार मार्केटमध्ये आता भीषण आग (Fire) लागली आहे. अग्निशमन विभागाला या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ३९ गाड्या आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. दिल्ली पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहे.

पहाटे चार वाजता जूता मार्केटजवळ आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.अग्निशमन दलाला आग लागल्याचा फोन आला. त्यानंतर 39 वाहने घटनास्थळी पाठवण्यात आली.सध्या आग आटोक्यात आली असून त्यात कोणीही अडकलेले नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. गल्ली क्रमांक 13 -14-15 मधील दुकानांना आग लागल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर ही आग वेगानं पसरत गेली. पहाटे चारच्या सुमारास आग लागल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, एक दिवस अगोदर म्हणजेच 11 जून रोजी शनिवारी सकाळी ब्रह्मशक्ती रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील आयसीयू वॉर्डमध्ये आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 9 गाड्या पाठवण्यात आल्या होत्या. या घटनेत एका रुग्णाचा मृत्यू देखील आला होता. ही घटना ताजी असतानाच दिल्लीतील करोलबागच्या गफ्फार मार्केटमध्ये आता भीषण आग लागल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Kale Case : पुण्यात पुन्हा गँगवॉर! गणेश काळेवर गोळ्या झाडतानाचा CTTV व्हिडिओ समोर

माजी मंत्र्यांच्या नातवाचा पाय खोलात; भाजप नेत्याकडून पैसे थकवल्याचा गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: कार्तिकीच्या निमित्ताने चंद्रभागा स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी

Satara Tourism : कास पठाराजवळ लपलाय निसर्गाचा अद्भुत नजारा, थंडीत येथे आवर्जून जा

Crime News: बायकोसोबत अवैध संबंधाचा संशय, नवऱ्याने केली तरुणाची गळा चिरून हत्या

SCROLL FOR NEXT