MRPL Refinery Blast, MRPL Saam
देश विदेश

तेल रिफायनरीत भीषण स्फोट! आजूबाजूच्या इमारती हादरल्या, काळा धूर अन्...; परिसरात उडाली प्रचंड घबराट

MRPL Refinery Blast, MRPL :कर्नाटकातील मंगळुरू येथील MRPL रिफायनरीत भीषण स्फोट झाला. स्फोटाच्या तीव्रतेने आजूबाजूच्या इमारती आणि विमानतळाच्या काचा हादरल्या.

Namdeo Kumbhar

कर्नाटकातील मंगळुरू येथील 'मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड' (MRPL) मध्ये अचानक एक भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. हा स्फोट इतका भयंकर होता की, आजूबाजूच्या इमारती आणि अगदी विमानतळाच्या खिडक्यांच्या काचाही हादरल्या. या दुर्घटनेत ८ पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितले आहे.

या भीषण स्फोटानंतर परिसरात धुराचे लोट पसरले. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. तांत्रिक बिघाडामुळे की दाब वाढल्यामुळे हा स्फोट झाला, याचा तपास तज्ज्ञांचे पथक करत आहे. सध्या पोलीस आणि प्रशासनाकडून मदतकार्य वेगाने सुरू आहे. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे.

स्फोटाच्या तीव्रतेमुळे मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रशासकीय कार्यालयाच्या काचेच्या खिडक्या जोरदारपणे हादरल्या. या घटनेमुळे विमानतळ कर्मचारी आणि उपस्थित असलेल्या इतरांमध्ये काही काळासाठी घबराट पसरली असल्याचे वृत्त आहे. एमआरपीएल संकुलालगतच्या जोकट्टे गावात स्फोटाचा धक्का जाणवला. जोकट्टे ग्रामपंचायत कार्यालय आणि जवळच्या घरांचे दरवाजे व खिडक्या फुटल्या. स्फोटानंतर एमआरपीएस युनिटमधून काळ्या धुराचा लोट उठू लागला आणि हा धूर कित्येक किलोमीटर अंतरावरून दिसत होता.

स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, या घटनेत आठ जण जखमी झाले आहेत. एमआरपीएलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, एक कंत्राटी कामगार ३५ टक्के भाजला आहे. दरम्यान, याआधी सोमवारी संध्याकाळी (२१ सप्टेंबर, २०२६), उत्तर प्रदेशातील कानपूर देहात येथील एका टायर कारखान्यातील इंधनाच्या टाकीला आग लागून स्फोट झाला. या घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अनेक अग्निशमन दलाच्या गाड्यांना प्रयत्न करावे लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कल्याण-बदलापूर-कर्जत हायवेवरच शेती करणार; दुकानदारांचा आक्रमक पवित्रा, प्रशासनाचे धाबे दणाणले

Maharashtra News Live Update: भारताच्या लोकशाहीवर भाजपने हल्ला केलाय- राहुल गांधी

Mumbai News: मुंबईत माजी खासदाराविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Bharda Vade: पितृपक्षात नैवेद्यासाठी हा खास पदार्थ; बाहेरून एकदम कुरकुरीत, आतून मऊ भरड्याचे वडे

Amravati News: अमरावती रुग्णालयातील स्फोटाचा VIDEO समोर, ३ नवजात बाळांचा झाला होता मृत्यू

SCROLL FOR NEXT