Massive earthquake hits Nepal in the midnight 70 people dead many injured Saam TV
देश विदेश

Earthquake in Nepal: नेपाळमध्ये मध्यरात्री मोठा भूकंप, शेकडो इमारती कोसळल्या; आतापर्यंत ७० जणांचा मृत्यू

Nepal Earthquake Latest News: शुक्रवारी मध्यरात्री नेपाळमध्ये ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा मोठा भूकंप झाला आहे. यामध्ये आतापर्यंत ७० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

Satish Daud

Nepal Earthquake Latest News

भारताचा शेजारी देश असलेल्या नेपाळ पुन्हा एकदा भुकंपाने हादरला आहे. शुक्रवारी मध्यरात्री नेपाळमध्ये ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा मोठा भूकंप झाला आहे. यामध्ये शेकडो इमारतींची पडझड झाली असून घटनेत आतापर्यंत ७० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. नेपाळच्या पीएमओ कार्यालयानेही ट्विट करुन नेपाळमधील भूकंपाची माहिती दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या बचावकार्य सुरू असून मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. नेपाळच्या उत्तरी-पश्चिम जिल्ह्यांमध्ये भूकंपामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. रुकूम पश्चिम जिल्ह्यात ३६ आणि जाजरकोट येथे २० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे, जखमींची संख्याही मोठी असल्याचे समजते.

नेपाळच्या PMO कार्यालयानेही ट्वीट करुन घडलेल्या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच बचाव पथकांना घटनास्थळी पाठवल्यात आल्याचे सांगितले. नेपाळच्या राष्ट्रीय भूकंप मापन केंद्रानुसार, नेपाळच्या जाजरकोट जिल्ह्यातील लामिडांडा भागात भूकंपाचा केंद्रबिंदू होता.

या भूकंपाची तीव्रता इतकी भीषण होती, की यामध्ये शेकडो इमारती कोसळल्या आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत ७० जणांचा मृत्यू झाला असून ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या भूकंपाचे धक्के दिल्ली-एनसीआरसह उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही जाणवले आहेत. येथील नागरिक भीतीपोटी घरातून बाहेर निघाले. सुदैवाने यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.दिल्ली-एनसीआरपर्यंत ६० सेकंदांपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवत होते, असे काही नागरिकांनी सांगितले. याआधी २२ ऑक्टोबर २०२३ रोजी दिल्लीत भूकंपाचे तीव्र धक्के बसले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

SCROLL FOR NEXT