File Photo Saam Tv
देश विदेश

बगदादमधील फुटबॉल स्टेडियमजवळ भीषण स्फोट, 10 ठार तर 20 हून अधिक जखमी

मृत आणि जखमींमध्ये फुटबॉल खेळणाऱ्या लोकांचा समावेश आहे.

वृत्तसंस्था

Baghdad Explosion Near Football Stadium : इराकची राजधानी बगदादमध्ये फुटबॉल स्टेडियमजवळ स्फोट झाला आहे. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. तर जखमींना रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. मृत आणि जखमींमध्ये फुटबॉल खेळणाऱ्या लोकांचा समावेश आहे. (Iraq Bomb Blast)

मिळालेल्या माहितीनुसार, स्टेडियमजवळ असलेल्या गॅस टँकरमध्ये हा स्फोट झाला.स्फोट इतका जोरदार होता की आजूबाजूच्या घरांच्या खिडक्यांच्या काचेला तडे गेले आहे. तसेच घटनास्थळाजवळ उभ्या असलेल्या अनेक वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इराकचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल लतीफ रशीद यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा होणार असल्याची ग्वाही अब्दुल लतीफ रशीद यांनी दिली.

सोमालियाच्या राजधानीत दोन स्फोट, अनेकांचा मृत्यू

तर सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये शनिवारी एका प्रमुख सरकारी कार्यालयाजवळ गर्दीच्या ठिकाणी दोन स्फोट झाले, ज्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी सुद्धा झाले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: लक्ष्मीच्या कृपेमुळे पैशाची चणचण दूर होणार, दिवाळीत या राशींच्या व्यक्तींचे नशीब उजळणार

Monday Horoscope : दिवाळी चांगली जाईल, मनातील इच्छा पूर्ण होणार; 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार

Viral Video of Namaz at Shaniwarwada: 'ते' एक ट्विट आणि शनिवारवाड्यातील नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल; ऐन दिवाळीत पुण्यातील वातावरण का तापले?

Aditi Rao Hydri: अदिती राव हैदरीचा नवा डेनिम कॉर्सेट आणि बबल स्कर्ट लूक पाहिलात का?

दिवाळीत धमाका! शिंदेंचा थेट फडणवीसांना धक्का, भाजपच्या एकनिष्ठ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT