Bomber Rams Military Convoy saam Tv
देश विदेश

Massive Attack: लष्करी ताफ्याला स्फोटकांनी भरलेल्या वाहनाची धडक; १६ सैनिक ठार तर २५ जखमी

Bomber Rams Military Convoy: स्थानिक सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एक आत्मघातकी हल्लेखोराने स्फोटकाने भरलेलं वाहन सैनिकांच्या ताफ्याला धडक दिली. यात १६ सैनिकांचा मृत्यू झालाय.

Bharat Jadhav

पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील उत्तर वझिरीस्तान जिल्ह्यात आत्मघातकी हल्ला झालाय. या हल्ल्यात १६ सैनिक ठार तर २५ जण जखमी झाले. यात सैनिक आणि नागरिकांचाही समावेश आहे. स्थानिक सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, एका आत्मघातकी हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेले वाहन लष्करी ताफ्यातील एका वाहनाला धडकवले. यात १६ सैनिकांचा मृत्यू झाला आणि ६ लष्करी कर्मचारी आणि १९ नागरिक जखमी झाले. हल्ल्यात दोन घरांचे छप्पर कोसळले, ज्यामध्ये सहा मुले देखील जखमी झाली आहेत. (Pakistan suicide bombing in Khyber Pakhtunkhwa that left soldiers and children injured)

पाकिस्तान तालिबानच्या हाफिज गुल बहादुर शाखाने या हल्ल्याच्या जबाबदारी घेतलीय, एका एका प्रशासकीय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ४ जखमी सैनिकांची प्रकृती गंभीर आहे. २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबान पुन्हा सत्तेत आल्यापासून पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात हिंसाचार वाढला आहे.

अफगाणिस्तान आपल्या जमिनीच्या गैरवापर करत आहे. आपल्या देशातील जमिनीचा वापर पाकिस्तानविरोधात दहशतवादी कारवाया करण्यास करत आहे. दरम्यान तालिबानकडून पाकिस्तानने केलेले आरोप खोडून काढले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीपासून खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये झालेल्या हल्ल्यांमध्ये सुमारे २९० लोक मारले गेले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT