A shocking love story from Gonda, Uttar Pradesh, where a married woman chose her nephew over her family. Saam Tv
देश विदेश

प्रेमा तुझा रंग कसा! मामी भाच्याच्या प्रेमात वेडी, नवरा आणि दोन मुलांना सोडून दोघेही फरार

Married Woman Leaves Husband Children For Nephew: मामी-भाच्याच्या प्रेमप्रकरणाने खळबळ उडवली आहे. विवाहित महिलेने नवरा आणि दोन मुलांना सोडून भाच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे

Omkar Sonawane

असं म्हणतात की प्रेमात सर्व काही माफ असतं आणि प्रेमाला वयाचं बंधन ही नसतं. कोणाला कोणावर प्रेम होईल, हे सांगता येत नाही. असाच काहीसा धक्कादायक आणि चर्चेचा विषय ठरणारा प्रकार उत्तर प्रदेशातून समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ३० वर्षांच्या एका विवाहित महिलेला आपल्या भाच्याच्या प्रेमात पडली असून, तिने नवरा आणि दोन लहान मुलांना सोडून ११ वर्षांनी लहान असलेल्या भाच्यासोबत घरातून पळून गेल्याची घटना घडली आहे. मामी-भाचा यांच्या या प्रेमप्रकरणाची चर्चा सध्या संपूर्ण परिसरात सुरू आहे.

ही घटना गोंडा जिल्ह्यातील इटियाथोक पोलीस ठाणे हद्दीतील परना गावातील आहे. येथील रहिवासी दद्दन तिवारी हे पेशाने ट्रक चालक आहेत. चंदीगडमध्ये काम करत असताना त्यांची ओळख मनीषा हिच्याशी झाली होती. मनीषा यांच्या घरी दद्दन भाड्याने राहत होता. त्यानंतर २०१७ साली दोघांनी गोंडामध्ये कोर्ट मॅरेज केले. या दाम्पत्याला दोन मुले असून मोठा मुलगा ९ वर्षांचा तर लहान मुलगा ४ वर्षांचा आहे.

दरम्यान, मनीषाची ओळख तिच्या भाच्याशी विनीत दीक्षितसोबत झाली. दहावीनंतर शिक्षण सोडलेला विनीत हा दद्दनच्या घरी वारंवार येत जात असे. याच काळात मनीषा आणि विनीत एकमेकांच्या जवळ आले आणि गुपचूप भेटीगाठी सुरू झाल्या. या प्रेमसंबंधाची माहिती तिच्या नवऱ्याला मिळाल्यानंतर त्याने मनीषाला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र ती भाच्यासोबतच राहण्यावर ठाम राहिली. दोन महिन्यांपूर्वी तिने आत्महत्येचा प्रयत्न करत गळफास घेण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र कुटुंबीयांनी वेळीच हस्तक्षेप करून तिला वाचवले. दुसरीकडे विनीतनेही आपले ठरलेले लग्न मोडल्याची माहिती समोर आली आहे.

रविवारी रात्री मनीषाने विनीतला घरी बोलावले होते. दोघेही संपूर्ण रात्र एकत्र होते. सोमवारी सकाळी मनीषाच्या सासूबाईंनी घरात कपडे घ्यायला गेल्यानंतर विनीतला पाहिले आणि आरडाओरड केली. त्यामुळे परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. कुटुंबीयांनी दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ते ऐकण्यास तयार नव्हते. अखेर मंगळवारी हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांसमोर मनीषाने लेखी निवेदन देत आपण विनीतवर प्रेम करत असून त्याच्यासोबतच राहू इच्छिते, तसेच पती, मुले किंवा संपत्तीशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर पोलिसांनी मनीषाला तिच्या इच्छेनुसार प्रेमीसोबत जाण्याची परवानगी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाहन शिकताना कार गटारात; डोंबिवली MIDC परिसरात थरार

पुण्याच्या मुळशीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप? ठाकरे गटाने पुरावाच दिला

धक्कादायक! धावत्या ट्रेनमधून तरुणाने वाशीच्या खाडीत उडी मारली

धक्कादायक! 'युट्यूबर बळजबरी शारीरिक संबंध ठेवायचा, महिलेने ऑन कॅमेरा मांडली व्यथा; नेमकं प्रकरण काय?

Contrast Blouse for Pink Saree: तुमच्या पिंक साडीवर हे 5 कॉन्ट्रास्ट ब्लाऊज दिसतील ट्रेंडी आणि सुंदर

SCROLL FOR NEXT