Uttar Pradesh Crime News Saam TV
देश विदेश

Crime News : प्रेमाचा भयानक अंत, जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रेयसीला त्याने एका क्षणात संपवलं!

Uttar Pradesh Crime News : प्रेयसीच्या घरच्यांनी लग्नाला नकार दिल्याने एका प्रियकराने भररस्त्यात तिची गोळी झाडून हत्या केली.

Satish Daud

Uttar Pradesh Crime News : प्रेम प्रकरणात कोण कोणत्या थरावर जाईल सांगता येणार नाही. प्रेमात धोका मिळाल्यानंतर काहीजण नैराश्यात जातात. यातून मोठमोठ्या गुन्हेगारीच्या घटना घडतात. अशीच एक घटना उत्तरप्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यात घडली आहे. प्रेयसीच्या घरच्यांनी लग्नाला नकार दिल्याने एका प्रियकराने भररस्त्यात तिची गोळी झाडून हत्या केली.

प्रियकर इतक्यावरच नाही थांबला, तर त्याने स्वत:वर सुद्धा गोळी झाडून घेतली. या घटनेत दोघांचाही दुर्देवी मृत्यू झाला. नागेंद्र आणि मीनाक्षी असं मृत्युमुखी पडलेल्या प्रेमीयुगुलाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, नागेंद्र हा सुलतानपूर जिल्ह्यातील रामपूर गावातील रहिवाशी आहे. दोन वर्षापूर्वी त्याचे लग्न झाले होते. त्याला एक अपत्य देखील आहे. नागेंद्रचे त्याच्याच घराजवळ राहणाऱ्या मीनाक्षी या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मीनाक्षीचे नागेंद्रच्या घरी येणे जाणे होते.

नागेंद्र आणि मीनाक्षीने आपल्या प्रेमसंबंधाविषयी कुटुंबीयांना सांगितले. मला पत्नीला घटस्फोट देऊन मीनाक्षीसोबत लग्न करायचं आहे, असा तगादा नागेंद्र याने कुटुंबीयांकडे लावला. मात्र, मीनाक्षीच्या कुटुंबीयांनी नकार दिला.

दरम्यान, समाजात बदनामी होण्याच्या भीतीने मीनाक्षीच्या कुटुंबीयांनी तिचा विवाह शेजारील गावातील एका तरुणासोबत करण्याचं ठरवलं. मात्र, नागेंद्रला ही गोष्ट मान्य नव्हती. तू माझी नाहीस तर कुणाचीही नाही, असं तो नेहमी मीनाक्षीला म्हणायचा.

मंगळवारी (११ एप्रिल) नागेंद्रने मीनाक्षीला भेटण्यासाठी गावातील तलावाजवळ बोलावलं. मीनाक्षी तिथे जाताच त्याने तिची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर नागेंद्रने स्वत:वरही गोळी झाडली. या भयानक घटनेत दोघांचाही मृत्यू झाला.

संध्याकाळी तलावाकाठी फिरण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीने दोघांचेही मृतदेह पाहिले. या घटनेची माहिती त्याने तातडीने पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले. प्रेमप्रकरणातून प्रियकराने प्रेयसीची हत्या करत स्वत:ला संपवल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा तपास पोलिस करीत आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR 2025: आयटीआर ३ फॉर्म आता ऑनलाइन पाहता येणार, आयकर रिटर्न भरण्याची सोपी पद्धत काय? वाचा...

Maharashtra Tourism: नैसर्गिक सौंदर्य अन् नयनरम्य परिसर... धुळे जिल्ह्यातील 'ही' सुंदर ठिकाणं कधी पाहिलीत का?

Maharashtra Live News Update: ठाण्यात कंपनीची सुरक्षा भिंत कोसळली

Milk: रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने काय होते?

Evil Eye: नजर लागल्यावर दिसू लागतात 'हे' ४ संकेत, मुळीच करू नका दुर्लक्ष!

SCROLL FOR NEXT