Mark Zuckerberg Injury: Saam Tv
देश विदेश

Mark Zuckerberg Injury: मार्शल आर्ट्स आलं अंगाशी, मार्क झुकरबर्गचा मोडला पाय; रुग्णालयात दाखल

Mark Zuckerberg News: मार्शल आर्ट्स आलं अंगाशी, मार्क झुकरबर्गचा मोडला पाय; रुग्णालयात दाखल

Satish Kengar

Mark Zuckerberg Injury:

मेटा सीईओ आणि फेसबुकचा फाउंडर मार्क झुकरबर्ग याच्यावर शुक्रवारी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. नुकतेच त्याला मिश्र मार्शल आर्ट्स स्पर्धेची तयारी करताना गुडघ्याला दुखापत झाली. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तो हॉस्पिटलमध्ये बेडवर झोपलेला दिसत आहे. त्याच्या डाव्या पायाला पट्टी बांधलेली आहे आणि पायाला आधार देणारा ब्रेस दिसत आहे.

झुकेरबर्गने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, प्रशिक्षणादरम्यान त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. या दुखापतीत त्याच्या एसीएलला इजा झाली आहे. याचीच आता शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांची काळजी घेतल्याबद्दल त्यांनी डॉक्टर आणि टीमचे आभार मानले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कशी झाली दुखापत?

झुकेरबर्गने पोस्टमध्ये आपल्याला दुखापत कशी झाली, हे देखील सांगितले आहे. पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या एमएमए लढतीसाठी मी तयारी करत असल्याचे त्याने लिहिले आहे. मार्कने लिहिले आहे की, आता बरे झाल्यानंतर मी पुन्हा तयारीला लागेन. तुमच्या प्रेम आणि समर्थनासाठी सर्वांचे आभार. (Latest Marathi News)

एसीएल म्हणजे अँटीरियर क्रूसिएट लिगामेंट. हा शरीरातील एक असा घटक आहे जो मांडीचे हाड आणि नडगीचे हाड यांना जोडतो. मेयो क्लिनिकच्या मते, हालचाली करणे आणि उडी मारणे यादरम्यान अचानक थांबल्यास या प्रकारची दुखापत सामान्यतः खेळांदरम्यान होते. स्टॅनफोर्ड मेडिसिनच्या मते, एसीएल शस्त्रक्रियेनंतर बरे होण्यासाठी अनेक महिने लागू शकतात. या प्रकारच्या दुखापतीतून खेळाडूंना पूर्णपणे बरे होण्यासाठी साधारणपणे 9 ते 12 महिने लागतात.

झुकेरबर्गच्या फॉलोअर्सने त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. एका यूजरने लिहिले की, हे ऐकून खूप वेदना झाल्या. तू लवकर बरा व्हावं. दुसऱ्याने लिहिले, लवकर बरे व्हा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Fire : मुंबईत एकाच दिवशी दोन ठिकाणी आग; इमारतीमधील नागरिकांची पळापळ

Pan Masala: पान मसाल्याच्या पॅकेटवर होणार मोठा बदल, कंपन्यांना पॅकेजिंगबाबत सरकारचे निर्देश

Maharashtra Live News Update: पुण्यातील भोंदू बाबा आणि वेदिका पंढरपूरकर प्रकरणी मोठी अपडेट

Nashik Crime Bhushan Londhe: उत्तर प्रदेशातही 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला'; कुख्यात गुंडाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे सामना सुरू असतानाच भारतीय क्रिकेटपटूनं अचानक घेतला संन्यास, भावुक पोस्ट

SCROLL FOR NEXT