Sunil Tatkare PM Modi Meeting Saam
देश विदेश

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोडी! खासदार सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; मोठा निर्णय होणार?

Sunil Tatkare PM Modi Meeting : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांदरम्यान खासदार सुनील तटकरे यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांसाठी आर्थिक मदतीची मागणी करत त्यांनी रोहा रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनासाठी मोदींना निमंत्रण दिले.

Namdeo Kumbhar

Sunil Tatkare Meets PM Narendra Modi : देशात सध्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अचानक भेट घेतली. अनेक केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिल्याने लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

केंद्रातील मंत्रिपदांची रिक्त झालेली पदे, महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणि रोहा रेल्वे स्थानकाचे उद्घाटन या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या भेटीदरम्यान राज्यातील दुष्काळग्रस्त भागांसाठी भरीव मदत देण्याची मागणी तटकरे यांनी केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच रोहा रेल्वे स्थानकासाठी निधी मंजूर झाल्यानंतर त्याच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित राहावं, असं निमंत्रणही त्यांनी दिलं. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याकडे लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी भरीव मदतीची मागणी

या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान खासदार सुनील तटकरे यांनी महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीकडे पंतप्रधान मोदींचे लक्ष वेधले. राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडून भरीव आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी या वेळी केली.

रोहा रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदींना निमंत्रण

याशिवाय, रोहा रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी आणि आधुनिकतेसाठी केंद्र सरकारकडून भरीव निधी मंजूर झाला आहे. या कामांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे, यासाठी खासदार तटकरे यांनी त्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: एसटी प्रवाशांना मोठा दिलासा, भाडेवाढ होणार नाही; परिवहन मंत्र्यांची माहिती

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला ६० व्या वर्षी व्हायचे 'बाबा'; खुलासा करत म्हणाला - "मला मुलांची..."

Tanaji Sawant Mother Death : मत्री तानाजी सावंतांना मातृशोक! १०५ व्या वर्षी आईचे निधन; राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त

Cucumber seeds: काकडीच्या बिया आरोग्यासाठी खजिना; बियांच्या पावडरचं सेवन केल्यास मिळतील 5 आश्चर्यकारक फायदे

18 of Walking Daily : रोज चालण्याचे तब्बल १८ जबरदस्त फायदे; हा एक सोपा व्यायाम बदलेल तुमचं आयुष्य

SCROLL FOR NEXT