Johnson and Johnson: भारतात सिंगल-डोस लसीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता Saam Tv
देश विदेश

Johnson and Johnson: भारतात सिंगल-डोस लसीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता

भारतात जॉनसन अँड जॉन्सन कंपनीच्या सिंगल डोस लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: भारतात जॉनसन अँड जॉन्सन Johnson and Johnson कंपनीच्या सिंगल डोस लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली.

आरोग्यमंत्र्यांनी केले ट्विट;

आरोग्य मंत्री मनसुख मांडविया Mansukh Mandaviya यांनी ट्विट केले की जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. ही लस भारताच्या कोरोनाविरोधातील लढा मजबूत करेल.

जॉनसन अँड जॉन्सन कंपनीने शुक्रवारी केंद्र सरकारकडे भारतात सिंगल डोस कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली होती.

लसीकरण मोहिमेला वेग येईल;

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या मते, भारतात सिंगल डोस लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी एक मोलाचे ठरेल. यामुळे लसीकरण मोहिमेला गती मिळू शकेल.

जॉनसन अँड जॉन्सन कंपनीचा दावा आहे की त्याचा कोविड -19 चा एकच डोस कोरोना विषाणूविरूद्ध 85 टक्के प्रभावी आहे. असा दावा देखील करण्यात आला आहे की, लसीकरणानंतर 28 दिवसांच्या आत ते मृत्यूचे प्रमाण कमी करण्यास सक्षम आहे, रूग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची संख्या ही लस कमी करते.

जॉनसन अँड जॉन्सनने या लसीच्या वापरास मान्यता दिल्याने ही भारताची पहिली सिंगल डोस लस असेल. यापूर्वी भारतात कोवाक्सिन, कोविशील्ड आणि स्पुतनिक-व्ही आपत्कालीन वापरासाठी मंजूर झाले आहेत. या तीन लसी डबल डोस आहेत आणि लोकांना याचे 2 डोस घ्यावे लागतात.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलेश घायवळ हजर झाला नाही तर त्याची सर्व मालमत्ता जप्त करणार- पोलिसांचा इशारा

Weight loss diabetes medicine: वजन कमी करणारं औषध आलं, डायबेटीसही कंट्रोलमध्ये राहणार, भारतात किंमत किती?

Bride Useful Things: नव्या नवरीच्या कपाटात असायला हव्यात 'या' महत्वाच्या गोष्टी

Andheri-Bandra: अंधेरी ते वांद्रे १५ डब्ब्यांची लोकल धावणार; कधीपासून होणार सुरु?

MNREGA Scheme: मोठी बातमी! मनरेगा योजनेचे नाव बदलणार, मोदी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

SCROLL FOR NEXT