मन की बात: नद्यांच्या महत्वासोबत जनधन खात्याबाबत काय म्हणाले PM, नक्की वाचा... Saam Tv News
देश विदेश

मन की बात: नद्यांच्या महत्वासोबत जनधन खात्याबाबत काय म्हणाले PM, नक्की वाचा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) आज ८१ व्या वेळेस मन की बात (Mann Ki Baat) रेडिओ कार्यक्रमाद्वारे जनतेला संबोधीत केले. आजच्या मन की बातच्या ८१ व्या एपिसोडमध्ये जागतिक नदी दिवसानिमित्त (rivers day 2021) त्यांनी नद्यांचे महत्व सांगितले. तसेच डिजीटल इंडीया आणि जनधन (Jandhan Yojna) खात्यांमधून वाढत असणारे यूपीआय पेमेंट अशा अनेक मुद्दयांवर त्यांनी भाष्य केले. (Mann Ki Baat: Read exactly what PM said about importance of rivers and Jandhan Bank Account)

हे देखील पहा -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बातमध्ये जागतिक नदी दिनावर चर्चा केली. पीएम मोदी म्हणाले की, नदी आपले स्वतःचे पाणी पीत नाही , तर परोपकारासाठी वाहते, त्यामुळे नदी आपल्यासाठी मातेसमान आहे. आपण नदीकडे आई म्हणून बघतो. आपल्याकडे कितीतरी सण-उत्सव नदी मातेच्या कुशीत साजरे केले जातात. पुढे ते म्हणाले की, आजकाल एक विशेष ई-लिलाव चालू आहे. लोकांनी मला वेळोवेळी दिलेल्या भेटवस्तूंसाठी हे इलेक्ट्रॉनिक लिलाव आयोजित केले जात आहेत.

या लिलावातून येणारा पैसा 'नमामी गंगे' मोहिमेसाठी वापरण्यात येणार आहे. ते म्हणाले, 'अनेकांना माहित असेल की साबरमती नदीच्या काठावर महात्मा गांधींनी साबरमती आश्रम बांधले होते, ती नदी गेल्या काही दशकं कोरडी पडली होती. वर्षातील ६ ते ८ महिने पाणी दिसत नव्हते, पण नर्मदा नदी आणि साबरमती नदी जोडल्यानंतर साबरमती नदी पुन्हा प्रवाहित झाली, त्यामुळे जर तुम्ही आज अहमदाबादला गेलात, तर साबरमती नदीचे पाणी मनाला प्रसन्न करते.

स्वच्छतेची चळवळ

पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'आजच्या आपल्या तरुणांना हे माहित असलं पाहिजे की, स्वच्छता मोहिमेने स्वातंत्र्य चळवळीला सतत ऊर्जा कशी दिली. महात्मा गांधींनीच स्वच्छतेला जनआंदोलन बनवण्याचे काम केले होते. महात्मा गांधींनी स्वच्छतेला स्वातंत्र्याच्या स्वप्नाशी जोडले होते. 'आज अनेक दशकांनंतर स्वच्छता चळवळीने पुन्हा एकदा देशाला नवीन भारताच्या स्वप्नाशी जोडण्याचे काम केले आहे. जेव्हा स्वच्छतेची मोहीम पिढ्यानपिढ्या चालते, तेव्हा संपूर्ण समाज जीवनात स्वच्छतेचे स्वरूप निर्माण होते. ही स्वच्छता ही पूज्य बापूंना मोठी श्रद्धांजली आहे आणि आपण प्रत्येक वेळी ही श्रद्धांजली सतत देत राहू असं आवाहन पंचप्रधान मोदींना देशवासियांना केलं आहे.

जनधन खात्यांमुळे भ्रष्टाचार कमी झाला

गरिबांच्या हक्कांसाठी पैसे थेट जन धन खात्यांमधून त्यांच्यापर्यंत पोहोचले. पीएम मोदी म्हणाले की, जन धन खात्यांबाबत देशाने सुरू केलेली मोहीम आता तुम्हाला माहिती आहे. यामुळे, आज गरिबांना त्यांच्या खात्यात थेट त्यांचे योग्य पैसे मिळत आहेत, ज्यामुळे भ्रष्टाचारासारखे अडथळे मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत असंही पंतप्रधान म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya : नवरात्रीचा पहिला सोमवार तुमच्या राशीसाठी काय घेऊन आलाय?

Mahayuti News: हरियाणा-जम्मूमुळे महाराष्ट्रात महायुतीला टेन्शन? भाजपला फटका, काँग्रेसची सत्ता येणार?

Bigg Boss 18: ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंची बिग बॉस हिंदीच्या घरात धमाकेदार एन्ट्री, जाणून घ्या १६ सदस्यांची नावे

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कडूंवर 'प्रहार', बच्चू कडूंचा आमदार शिंदेंच्या गळाला

Suraj Chavan: बिग बॉस जिंकल्यानंतर 'सूरज'च्या गावात फटाक्यांची आतीशबाजी, गावकऱ्यांनी केली स्वागताची जंगी तयारी

SCROLL FOR NEXT