Manmohan Singh Saam Tv
देश विदेश

Manmohan Singh: RBI गव्हर्नर नसतानाही नोटेवर सही; मनमोहन सिंग यांचा कधीच न ऐकलेला किस्सा

Manmohan Singh Life story: मनमोहन सिंग यांची प्राणज्योत मावळली. त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक मोठ्या पदांवर काम केले. त्यातील एक पद म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर.

Siddhi Hande

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गुरुवारी शेवटचा श्वास घेतला...देशाच्या अर्थकारणाला नवी दिशा देणारा एक धुरंधर आपल्यातून गेला अशी भावना सर्वच स्तरातून व्यक्त होतेय...दरम्यान त्याच्या कारकीर्दीची चर्चा सुरु असताना एक रुपयाच्या नोट आणि मनमोहन सिंग यांची स्वाक्षरी यांची एक रंजक कहाणी समोर येतेय...

गव्हर्नर पदावर नाही तरीही नोटेवर सही

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्राणज्योत गुरुवारी मालवली...भारतात आर्थिक सुधारणांसाठी प्रयत्न करणे आणि यशस्वीरित्या त्या अंमलात आणून मध्यमवर्गीयांचे जीवनमान उंचावण्यात मनमोहन सिंग यांचा सिंहांचा वाटा होता.

सध्या मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीची चर्चा सुरु असताना एक मनमोहन सिंग यांच्याविषयीची एक रंजक कहाणी समोर येतेय....आणि ती म्हणजे एक रुपयाच्या नोटेची...

चलनातील नोटांवर रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नची स्वाक्षरी आपण वर्षानुवर्षे बघतोय...ज्या गव्हर्नच्या काळात नोटा छापल्या जातात त्या गव्हर्नची स्वाक्षरी त्या नोटेवर असते...

याला अपवाद होता मनमोहन सिंग यांचा...

ज्या काळी एक रुपयाची नोट चलनात होती...तेव्हा त्या नोटेवर रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नची नाही तर विद्यमान वित्त सचिवांची स्वाक्षरी असायची...

वर्ष १९७९ मध्ये जेव्हा मनमोहन सिंग वित्त सचिव बनले तेव्हा....त्या काळात छापलेल्या सर्व एक रुपयांच्या नोटांवर मनमोहन सिंग यांची स्वाक्षरी होती....

त्यानंतर अगदी पुढच्या काही वर्षातच म्हणजेच १६ डिसेंबर १९८२ साली मनमोह सिंग हे भारतीय रिजर्व बँकेच्या गव्हर्नर पदावर विराजमान झाले... तेव्हा त्यांच्या काळात छापलेल्या म्हणजेच १४ जानेवारी १९८५ पर्यंतच्या सर्वच नोटांवर मनमोहन सिंग यांची स्वाक्षरी बघायला मिळते....

मनमोहन सिंग यांचा गव्हर्नर पदाचा कार्यकाळही अतिशय उल्लेखनीय ठरला आणि तेव्हात ते सरकारच्या नजरेत आले...मनमोहन सिंग यांच्या अचाट आर्थिक समज आणि अभ्यास यामुळेच राजकारणाशी काहीह संबंध नसतानाही त्यांना वित्त मंत्री पद मिळाले...आणि मिळालेल्या या संधीचे सोनं करत सर्वसामान्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासोबतच त्यांनी देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT