देश विदेश

Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा पेटलं! २ दिवसात ७ जणांचा मृत्यू; ३ जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट सेवाही बंद

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा जातीय हिंसाचारांच्या घटना सुरू झाल्या आहेत. या महिन्यात आतापर्यंत हिंसाचाराच्या घटनांमध्ये किमान ११ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तेथील राज्य सरकारने काही जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू केली असून इंटरनेटवरही बंदी घातलीय.

Bharat Jadhav

देशातील उत्तर पूर्व दिशेकडील मणिपूर राज्यात पु्न्हा एकदा हिंसाचार उसळलाय. राज्यातील तीन जिल्ह्यात संचार बंदी लागू केल्यानंतर येथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय. इम्फाळ पूर्व, इंफाळ पश्चिम आणि थौबल तीन जिल्ह्यात कर्फ्यू लागू करण्यात आलाय. दरम्यान राज्यात मागील दोन दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे.या २ दिवसांत ७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

त्यानंतर तीन जिल्ह्यांच्या प्रशासनाने मंगळवारी सकाळी ११ वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्याचे आदेश जारी केलेत. संचारबंदी का केली यामागे बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था हे कारण सांगितले. इंटरनेटवरही ५ दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे.

वृत्तानुसार,सोमवारी वेगवेगळ्या ठिकाण हिंसेच्या घटना घडल्या. एक महिला आणि माजी सैनिकाची हत्या करण्यात आली होती.हत्या करण्यात आलेले व्यक्ती हे कुकी समुदायाचे होते. हे कांगपोकोपी जिल्ह्यातील रहिवाशी होते. तर महिलेचा मृतदेह थांगबह गावातील एका चर्चेच्या बाहेर आढळून आला. या महिन्यात ११ जणांचा बळी गेल्याचं सांगितलं जात आहे. ज्या माजी सैनिकाची हत्या झाली होती. त्या सैनिकाचं अपहरण करण्यात आलं होतं. त्या सैनिकांचा मृतदेह इम्फाळच्या पश्चिम भागातील जिल्ह्यातील सेकमाई गावात आढळून आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Job: इंडियन बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी भरती सुरु, पगार किती? जाणून घ्या

VIDEO : खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार कल्याणशेट्टी यांच्यात वाकयुद्ध | Marathi News

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

moravala Recipe: ‪आता घरच्या घरीच बनवा मोरावळा

Sambhajinagar News : उच्च न्यायालयाची निवडणूक आयोगास नोटीस; १५ लाख स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मतदानाचा प्रश्न

SCROLL FOR NEXT