Manipur News Saamtv
देश विदेश

Manipur News: मणिपूरची धग थांबेना! जमावाने भाजप कार्यालयाला लावली आग; इंटरनेट सेवा बंद

Manipur Latest News: मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमधील संघर्ष दिवसेंदिवस उग्र होत आहे.

Gangappa Pujari

प्रमोद जगताप, प्रतिनिधी

Manipur Dispute:

गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला मणिपूरमधील हिंसाचार अद्याप सुरूच आहे. मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमधील संघर्ष दिवसेंदिवस उग्र होत आहे. मणिपूरमध्ये सहा महिन्यांसाठी अफ्स्पा वाढवण्यात आला असतानाच थौबल जिल्ह्यात भाजप कार्यालयाला आग लावल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या मणिपूरमधील संघर्षाने पुन्हा एकदा हिंसक वळण घेतले आहे. २५ सप्टेंबर रोजी मणिपूरमधून बेपत्ता झालेल्या २ विद्यार्थ्यांच्या मृतदेहांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली. हे विद्यार्थी जुलैपासून बेपत्ता होते. हे फोटो समोर आल्यानंतर ठिकठिकाणी निषेध आंदोलन करण्यात येत आहे.

बुधवारी (२७, सप्टेंबर) राजधानी इंफाळसह अनेक ठिकाणी निषेध आंदोलने झाले. आंदोलकांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा समावेश होता. यावेळी आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये हिंसक चकमक झाली.

या चकमकीनंतर आंदोलकांनी थौबल जिल्ह्यातील भाजप कार्यालयाला आग लावली. तसेच इंफाळमधील भाजप अध्यक्षांच्या घरावर हल्ला केला आणि मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांची राख जाळली. आंदोलनकर्त्यांनी इंफाळ पश्चिम जिल्ह्यात आंदोलकांनी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या घराला आग लावण्याचाही प्रयत्न केला. त्यांनी घराच्या आवारात उभ्या असलेल्या दोन गाड्या पेटवून दिल्या आणि घराच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Plane Crash: बारामतीत विमान कोसळलं, वैमानिकाची स्टंटबाजी; स्थानिकांचा आरोप

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; म्हाडाचे अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवली, कारण काय?

Milk Price Hike: सर्वसामान्यांना मोठा झटका! अमूल अन् मदर डेअरीचे दूध महागले, नवे दर किती?

bridge collapse : मोठा अनर्थ टळला! डंपरच्या भारानं जुना पूल कोसळला, सुधागडमधील दुर्घटना

पुण्यानंतर मुंबईत खळबळ; CSMT, BMC वर संशयास्पद ड्रोन; नागरिक भयभीत

SCROLL FOR NEXT