Re Polling Announced In Manipur Saam Tv
देश विदेश

Manipur Lok Sabha Election 2024: मतदानादरम्यान गोळीबार आणि हाणामारीची घटना, मणिपूरच्या 11 बूथवर 22 एप्रिलला पुन्हा होणार मतदान

Priya More

देशामध्ये लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पहिल्या टप्प्यासाठी १९ एप्रिल रोजी २१ राज्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडल्या. यामध्ये मणिपूर राज्याचा समावेश होता. मणिपूरमध्ये मतदान प्रक्रियेदरम्यान (Manipur Loksabha Election 2024) अनेक ठिकाणी गोळीबार आणि हाणामारीच्या घटना घडल्या. यानंतर मणिपूरचे मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिपूर लोकसभा निवडणुकीदरम्यान 11 मतदान केंद्रांवर गोळीबार आणि हाणामारीची घटना घडली. याठिकाणी पुन्हा मतदान घेण्यात येणार आहे. या केंद्रांवर २२ एप्रिलला पुन्हा मतदान होणार आहे.

मणिपूरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी गोळीबार आणि हाणामारी झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या. मणिपूरमध्ये मतदानाच्या दिवशी झालेल्या गोळीबारीच्या घटनेमध्ये एक नागरिक जखमी झाला होता. तर मणिपूरच्या इम्फाळमधील मोइरांगकंपू सेब अवांग लीकाई येथील मतदान केंद्रावर हाणामारी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. आता याबाबत निवडणूक आयोगाने पुन्हा मतदान करण्याचे आदेश दिले आहेत. मणिपूरचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्याच्या आदेशानुसार आणि घोषणेनुसार या मतदान केंद्रांवर 22 एप्रिल रोजी पुन्हा मतदान होणार आहे.

मणिपूरचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार,'भारतीय निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 58(2) आणि 58A(2) अंतर्गत निर्देश दिले आहेत की, 11 मतदान केंद्रांवर 19 एप्रिल म्हणजेच शुक्रवारी मतदान झाले होते. आता या मतदान केंद्रावर 22 एप्रिल रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पुन्हा मतदान प्रक्रिया होणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. मणिपूरमध्ये 19 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत 69.18 टक्के मतदान झाले होते.

ज्या मतदान केंद्रांवर पुनर्मतदान घेण्यात येणार आहे ते म्हणजे मोइरांगकंपू साजेब उच्च प्राथमिक शाळा आणि एस. इबोबी प्राथमिक शाळा (पूर्व विभाग), क्षेत्रीगावमधील चार मतदान केंद्र, थोंगजूमध्ये एक मतदान केंद्र, उरीपोकमध्ये तीन मतदान केंद्र आणि कोंथौजममध्ये एक मतदान केंद्रांचा समावेश आहे. 19 एप्रिल रोजी मणिपूरमधील काही मतदान केंद्रांवर हिंसाचाराच्या घटना घडल्या. याठिकाणी काहींनी गोळीबार केला आणि ईव्हीएम मशिनची देखील तोडफोड केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT