Manipur Terrorist Bomb Attack Saam Tv
देश विदेश

Shocking : हृदयद्रावक! मध्यरात्री घरावर बॉम्ब हल्ला, आईच्या कुशीत झोपलेल्या २ चिमुकल्यांचा जागीच मृत्यू

Manipur Terrorist Bomb Attack : मणिपूरमध्ये मध्यरात्री झालेल्या बॉम्बहल्ल्यात आईच्या कुशीत झोपलेल्या दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला असून आई गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Alisha Khedekar

  • मणिपूरमध्ये मध्यरात्री बॉम्बहल्ला

  • दोन लहान मुलांचा मृत्यू, आई गंभीर जखमी

  • कुकी अतिरेक्यांवर हल्ल्याचा आरोप

  • परिसरात तणावपूर्ण वातावरण

मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यातून काळजाचा थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. एका दहशतवादी हल्ल्यात आईच्या कुशीत झोपलेल्या दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्यांची आई गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्मण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ६ आणि ७ एप्रिलच्या रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास बिष्णुपूर जिल्ह्यातील चुराचंदपूरजवळच्या मोइरांग त्रोंगलाओबी गावात कुकी अतिरेक्यांनी एका घरावर बॉम्ब हल्ला केला. या घरात एक महिला आपल्या दोन मुलांसोबत झोपलेली होते.

गाढ झोपेत असताना झालेल्या या बॉम्ब हल्ल्यात महिलेच्या कुशीत झोपलेल्या पाच वर्षांचा मुलगा आणि सहा महिन्यांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी दोन मुलांना मृत घोषित केले. मोइरांग त्रोंगलाओबी गावात गोळीबाराच्या घटना वारंवार घडत आहेत. या भागातील स्थानिक भाजप नेते टी. एच. शांती सिंह यांनी त्रोंगलाओबी येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला.

भाजप नेते टी. एच. शांती सिंह यांनी हा हल्ला कुकी नार्को-दहशतवाद्यांनी केला असल्याचा दावा केला. ही भीषण घटना म्हणजे दहशतवादाचे कृत्य असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान या घटनांनी परिसरात तणावपूर्वक परिस्थिती निर्मण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

राहुल गांधींचा फोन अन् भाजपचा प्लॅन फेल; राज्यातील बड्या नेत्याच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक

SCROLL FOR NEXT