Marriage Saam Tv
देश विदेश

पठ्ठ्याचं 14 महिलांशी लग्न, 14 व्या पत्नीला माहित होताच झाला भांडा फोड

ओडिशाच्या केंद्रपारा जिल्ह्यातील पाटकुरा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील रहिवासी असलेल्या या व्यक्तीने कथित पत्नींना सोडण्यापूर्वी या महिलांकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. मात्र, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

वृत्तसंस्था

भुवनेश्वर - 'डॉली की डोली' या चित्रपटात एक महिला पैसे मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पुरूषांसोबत लग्न करते आणि त्यानंतर पसार होते. अशीच काहीशी घटना ओडीशामध्ये (Odisha) घडली आहे. देशातील सात राज्यांतील तब्बल १४ महिलांशी लग्न करणाऱ्या एका ६० वर्षीय व्यक्तीला अटक (Arrest) करण्यात आली आहे. रमेश चंद्र स्वेन असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (Man married with14 women in 7 states)

ओडिशाच्या केंद्रपारा जिल्ह्यातील पाटकुरा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील रहिवासी असलेल्या या व्यक्तीने कथित पत्नींना सोडण्यापूर्वी या महिलांकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. मात्र, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने हे आरोप फेटाळून लावले आहेत. भुवनेश्वरचे पोलीस उपायुक्त उमाशंकर दास यांनी याबाबद सांगितले की, आरोपीने 1982 मध्ये पहिले आणि 2002 मध्ये दुसरे लग्न केले होते आणि या दोन्ही लग्नातून त्यांना पाच मुले आहेत.

हे देखील पहा -

दास यांनी सांगितले की, 2002 ते 2020 या काळात त्याने वैवाहिक वेबसाइटच्या माध्यमातून इतर महिलांशी मैत्री केली आणि पहिल्या पत्नींना न सांगता या महिलांशी लग्न केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे त्याच्या शेवटच्या पत्नीसोबत राहत होता, जी दिल्लीत शाळेत शिक्षिका आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, या महिलेला मागील लग्नांची माहिती मिळाली आणि त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सोमवारी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी रमेशला अटक केली. यादरम्यान आंध्र प्रदेश पोलिसांनी त्याला २०११ मध्ये अटकही केल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलीस उपायुक्तांच्या म्हणण्यानुसार, आरोपी मध्यमवयीन अविवाहित महिलांना, विशेषत: घटस्फोटित महिलांना बळीबनवायचा, जे विवाहविषयक वेबसाइटवर जोडीदार शोधत होते. पोलिसांनी आरोपींकडून 11 एटीएम कार्ड, चार आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे जप्त केली आहेत. त्याने पंजाब, आसाम, झारखंड, दिल्ल आणि ओडिशासह सात राज्यांतील महिलांची फसवणूक केली आहे. त्याच्या पहिल्या दोन बायका ओडिशामधील होत्या.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT