Google Map  Saam Tv
देश विदेश

Google Map: सावधान! शॉर्टकटसाठी गुगल मॅप्सची मदत घेताय? घडलेला 'हा' प्रकार वाचून तुम्हाला धक्काच बसेल

Google Map Route: आपण लवकर पोहोचण्यासाठी आपला वेळ वाचवण्यासाठी गुगल मॅप्सची मदत घेतो. गुगल मॅपवर डोळे झाकून विश्वास ठेवतो, पण अनेकदा ही मदत आपल्याला महागात पडू शकते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tamil Nadu News

तुम्ही पण शॉर्टकट शोधायला गुगल मॅप्स (Google Map) वापरता का? तर मग तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. तामिळनाडूमधील एका व्यक्तीने असाच आपला वेळ वाचविण्यासाठी गुगल मॅप्सची मदत घेतली. आणि त्याची भयंकर फजिती झाली. म्हणजे या घटनेनंतर तो पुन्हा गुगल मॅप्स वापरेल का? असा प्रश्न निर्माण होतोय.

तामिळनाडू येथील गुडलूरमध्ये एका व्यक्तीला गुगल मॅप्सची घेणं चांगलंच महागात पडलंय. तो मित्रांसोबत वीकेंड घालवून परतत होता. त्यानंतर त्याने शॉर्टकट शोधण्यासाठी गुगल मॅप्स सुरू केला. मॅप्सने दाखवलेल्या रस्त्याने या व्यक्तीने आपली गाडी नेण्यास सुरूवात केली, अन तो भलत्याच ठिकाणी पोहोचला. एका ठिकाणी जाऊन पायऱ्यांवर अडकला. कसाबसा स्थानिक लोकं आणि पोलिसांच्या मदतीने त्याने आपली गाडी यातून बाहेर काढली.

गुगल मॅप अनेकदा लोकांना शहरापासून खेड्यापर्यंत कोणतंही स्थान शोधण्यात मदत करतो. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की ट्रॅफिक टाळण्यासाठी किंवा वेळ वाचवण्यासाठी लोक गुगल मॅपच्या मदतीने नवीन मार्ग शोधतात. काहीवेळा गुगल मॅपवर (Google Map Route) आंधळेपणानं विश्वास ठेवणं महागात पडतं. असंच एक प्रकरण तामिळनाडूतील गुडलूर या शहरातून समोर आलंय. मिळालेल्या माहितीनुसार ही व्यक्ती कर्नाटकात जाण्यासाठी गुगल मॅप वापरत होती.

गुगल मॅप्सच्या साहाय्याने गाडी पायऱ्यांच्या वर पोहोचली. गुगल मॅप्स फॉलो करत असलेला व्यक्ती गुडलूरच्या डोंगराळ भागात त्याच्या वाहनासह अडकला. तो सुट्टी त्याच्या मित्रांसोबत घालवून परतत होता. यादरम्यान त्याचे मित्रही त्याच्यासोबत कारमध्ये होते. त्यांचे फोटोही समोर आले आहेत. ज्यामध्ये गाडी टेकडीच्या वरच्या पायऱ्यांमध्ये अडकल्याचे दिसत आहे.

गुडलूर हे तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक यांच्या ट्राय जंक्शनवर आहे. पर्यटनासाठी हे लोकांचं आवडतं ठिकाण आहे. उटीला जाणारे पर्यटक येथे येतात. या व्यक्तीने सांगितले की, गुगल मॅप्सने हा "सर्वात जलद मार्ग" (Google Map) असल्याचा दावा केला होता. त्यामुळे तो या रस्त्याने आला.

यानंतर चालकाने पुढे जाता येत नसल्याने पायऱ्यांवर वाहन थांबवून लोकांची व पोलिसांची मदत घेतली. त्याच्या मदतीसाठी स्थानिक लोक आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. कसंतरी पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने गाडी मुख्य रस्त्यावर आणली. त्यानंतर कारमध्ये असलेल्या सर्व लोकांना त्यांचा पुढील प्रवास सुरू करता आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

SCROLL FOR NEXT