Bugs found in Chicken Biryani  Saam tv
देश विदेश

Bugs found in Chicken Biryani : किळसवाणा प्रकार! चिकण बिर्याणीत आढळल्या अळ्या, ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरुच

Vishal Gangurde

नवी दिल्ली : आईस्क्रिममध्ये माणसाचं बोट, चिप्स पाकिटामध्ये मेलाल बेडूक आढळल्याच्या घटना ताज्या असताना चिकण बिर्याणीत अळ्या आढळल्याची घटना समोर आली आहे. हैदराबादमधून हा प्रकार समोर आला आहे. हैदराबादमधील एका व्यक्तीने एका हॉटेलमधून ऑनलाईन मागवलेल्या चिकण बिर्याणीत अळ्या आढळल्या आहेत. या चिकण बिर्याणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हैदराबादमधील एका व्यक्तीने कुकटपल्ली येथील एका हॉटेलमधून ऑनलाईन चिकण बिर्याणी मागवली. या व्यक्तीला चिकण बिर्याणी खाताना पीसमध्ये अळ्या आढळून आल्या. यानंतर या व्यक्तीने एक्स मीडियावर संबंधिताना टॅग करत पोस्ट लिहून जाब विचारला.

या व्यक्तीने ऑनलाईन ऑर्डर कस्टमर सर्व्हिसकडे खराब अन्नाची तक्रार केली. त्यानंतर त्यांनी ग्राहकाला बिलातून ६४ रुपये रिफंड करण्याची ऑफर दिली. यानंतर संतापलेल्या व्यक्तीने सोशल मीडियातून संबंधित हॉटेलमधून अन्न खरेदी करू नका, असं आवाहन केलं आहे. या व्यक्तीने पोस्ट केल्यानंतर एकाने म्हटलं की, 'माझ्यासोबत असाच प्रकार झाला. माझ्या जेवणात प्लास्टिकचा तुकडा आढळला होता.

गुजरातमध्ये वेफर्समध्ये आढळला मेलेला बेडूक

गुजरातमध्ये एका वेफर्सच्या पाकिटात मेलेला बेडूक आढळल्याची घटना समोर आली आहे. या पाकिटात मेलेला बेडूक आढळला. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओनंतर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

आईस्क्रिममध्ये आढळलं माणसाचं बोट

मुंबईत काही दिवसांपूर्वी एका डॉक्टरने ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रिममध्ये माणसाचं तुटलेलं बोट आढळलं होतं. चक्क खातानाचा आईस्क्रिममध्ये माणसाचं बोट आढळल्याने या व्यक्तीची पायाखालची वाळूच सरकरली होती. मुंबईतील मालाडमधील डॉक्टरसोबत हा प्रकार घडला. या डॉक्टरने तातडीने हे बोट बर्फात ठेवून पोलिसांना कळवलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : कोणाच्या राशीत आज काय? वाचा राशीभविष्य

Fact Check : एअरफोन वापरल्याने चेहर्‍याला मारू शकतो लकवा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Mrunal Thakur: आंखों ही आंखों में इशारा हो गया...

Bhumi Pednekar: भूमी पेडणेकरच्या नव्या लूकची चर्चा, नेटकऱ्यांनी उर्फीसोबत केली तुलना

Heart Attack Treatment : हार्ट अटॅकवर उपचार तुमच्या जवळच्या रुग्णालयात; मोफत औषध उपलब्धही होणार, जाणून घ्या सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT