Saam TV Breaking News Saam TV Breaking News
देश विदेश

Muharram : मोहरम उत्सवात दुर्घटना, आगीत हनुमंतचा मृत्यू; काळजात धस्स करणारी घटना

Muharram News : रायचूरमध्ये मोहरम साजरा करताना ४० वर्षीय हनुमंत यांचा आगीत पडून मृत्यू. गावात शोककळा, पोलिस तपास सुरू. बिहारमध्येही मोहरमवेळी अपघात, २४ जखमी.

Namdeo Kumbhar

देशभरात मोहरमचा उत्साव साजरा केला जात आहे. कर्नाटकमधील रायचूरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. मोहरमसाठी तयार करण्यात आलेल्या आगीत पडल्यामध्ये ४० वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्याचं नाव हनुमंत असल्याचे समोर आलेय. आगीत पडल्यामुळे हनुमंत गंभीर भाजला होता. त्याला जखमी अवस्थेत रूग्णालयात दाखल करण्यात आले, पण त्याचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले नाही. याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद पोलिसांनी केली आहे.

कर्नाटकमधील रायचूर जिल्ह्यातील यारागुंटी गावात ही काळजात धस्स करणारी घटना घडली आहे. मोहरमसाठी यारागुंटी गावातील नागरिक जमले होते. पण यावेळी मोठी दुर्घटना घडली. ४० वर्षाच्या हनुमंत यांचा पाय घसरून मोहरमसाठी तयार करण्यात आलेल्या आगीमध्ये पडले. त्यांना तात्काळ लिंगसुगुर येथील सरकारी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण त्यांना वाचवण्यात अपयश आले, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. लिंगसुगुर पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. स्थानीय पोलिसांकडून या घटनेचा तपास करण्यात येत आहे. हनुमंत यांचा मृत्यू कसा झाला? याबाबत तपास वेगात सुरू आहे.

ही घटना मोहरमच्या तयारीदरम्यान घडली, जो इस्लामिक कॅलेंडरचा पहिला महिना आहे आणि शिया समुदायासाठी विशेषतः महत्त्वाचा आहे. या अपघातामुळे स्थानिक समुदायात शोक पसरला आहे. प्रशासनाने लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

बिहारमध्येही दुर्घटना

बिहारमधील दरभंगामध्येही मोहरम उत्सवावेळी दुर्दैवी घटना घडली आहे.मोहरम जुलूस निघाला त्यावेळी हायटेंशन तारेत करंट आला अन् २४ जण जखमी झाले. या दुर्दैवी घटनेत एकाचा मृत्यू झाला. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2026: चंद्र ग्रहणाच्या वेळी या गोष्टी दान करणं मानलं जातं शुभ; आयुष्यातील अडचणींपासून मिळेल मुक्ती

HSRP Number Plate: मुदत संपली! अजूनही लाखो वाहनधारकांनी HSRP नंबरप्लेट बसवली नाही; दिवसाला किती दंड भरावा लागणार?

Eyebrow Shape Tips: चेहऱ्यानुसार आयब्रोचा शेप कसा निवडावा? सुंदर अन् रेखीव डोळ्यांसाठी खास टिप्स

Maharashtra Live News Update: राष्ट्रपतींच्या ताफ्यासमोर अचानक कुत्रा; पोलिसांची धावपळ

Rashmika-Vijay Wedding : फोटोंमधून सांगितली जाणार विजय-रश्मिकाची प्यारवाली लव्ह स्टोरी; संगीत समारंभाचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT