Divorce Party Shocker: Saam Tv
देश विदेश

Divorce: घटस्फोटानंतर दुग्धाभिषेक, केक कापला; जंगी सेलिब्रेशन करणारा तरुण आहे तरी कोण?

Divorce Party Shocker: तरुणाने बायकोला घटस्फोट दिल्यानंतर जंगी पार्टी केली. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. दुग्धाभिषेक करून सूट बूट घालून या तरुणाने केक कापला. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ खरा आहे की खोटा? वाचा सविस्तर...

Priya More

सुप्रीम मसकर, साम टीव्ही

एका तरुणानं आपला घटस्फोट साजरा करत सेलिब्रेशनचा थेट व्हिडिओ बनवलाय. मात्र हा व्हिडिओ खरा आहे का खोटा? हा तरुण नेमका कोण आहे? या तरुणानं घटस्फोट का घेतला? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

हा व्हिडिओ पाहा. घटस्फोट झाल्याच्या आनंदात एका तरुणाला चक्क त्याच्या आईनं दुधानं अभिषेक घातलाय. इतकचं नव्हे तर या तरुणानं केक कापलाय.. ज्यावर हॅपी डिव्होर्स असं लिहीलय. या तरुणाचं नावं आहे दत्ता बिरादर. त्यानं व्हिडिओ शेअर करताना. पोस्टमध्ये काय लिहलंय पाहूयात..

“आनंदी राहा, स्वतःचा आनंद साजरा करा आणि निराश होऊ नका. 120 ग्रॅम सोनं आणि 18 लाख रोख घेतले नाही तर मी दिलेत. सिंगल हूं, खुश हूं, आझाद हूं. मेरी जिंदगी, मेरे नियम, सिंगल और हॅपी.” हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यात खरचं काही तथ्य आहे का असा प्रश्न निर्माण झाल्यानं साम टिव्हीनं कर्नाटकातील या तरुणाची प्रतिक्रीया जाणून घेतली.

दत्ता बिरादर म्हणतो, 'हा व्हिडिओ खरा असून या घटनेनंतर मी ड्रिप्रेशनमध्ये होतो. मनात आत्महत्येचाही विचार येतं होते. मात्र माझ्यासारखे अनेक जण ट्रॉमामध्ये असतील म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवलाय." देशभरात घटस्फोटाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतेय.. यामागे अनेक कारणं आहेत. परदेशी 'हॅपी डिवोर्स'चा हा ट्रेंड यापुढे आपल्या देशातही फॉलो करावा का हे ज्याचं त्यानं ठरवावं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: घटस्फोटित महिलेचा लग्नासाठी हट्ट; ज्याला जीव लावला त्यानेच जीव घेतला

Maharashtra Live News Update: मेट्रो वन मार्गावर बिघाड ; साकीनाका स्थानकात तांत्रिक अडचण

Sonali Bendre: मराठमोळ्या सोनाली बेंद्रेचा हटके साडी ड्रेपिंग स्टाइल; मॉर्डन साडी लूकसाठी तुम्हीही करा या टिप्स फॉलो

PAN-Aadhaar Linking: ...तर तुमचं पॅन कार्ड कायमचं होईल बंद, कधीपर्यंत दिली मुदत?

Esha Gupta Photos: रॉयल लूकमध्ये दिसली अभिनेत्री, फोटो पाहून सौंदर्याचं कराल कौतुक

SCROLL FOR NEXT