Mamata Banerjee TMC Spilt : पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळजनक ट्विस्ट समोर आला आहे. तृणमूल काँग्रेसच्या आमदारानंतर आता खासदारांनीही राजीनामा देण्यास सुरूवात केली आहे. माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीत दाखल झाल्या आहेत. पण त्याचवेळी २ खासदारांनी राजीनामा दिला. त्याशिवाय ममता बॅनर्जी दिल्लीत पोहोचत टीएमसीचे २० पेक्षा अधिक खासदार अचानक 'नॉट रीचेबल' झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
टीएमसीच्या सुखेंदू शेखर रॉय आणि कोएल मल्लिक या २ खासदारांनी आज अचानक तडकाफडकी राजीनामा दिला. त्यासोबतच २० पेक्षा जास्त खासदार नॉटरिचेबल आहेत. त्यामधील ५ खासदार थेट भाजप नेत्यांच्या घरी बैठकीला पोहोचले. या बैठकीला पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शूभेंदू अधिकारी उपस्थित होते.
राजधानी दिल्लीमध्ये भाजप नेते भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी टीएमसी खासदारांची बैठक सुरू असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. या गुप्त बैठकीला भाजपचे दिग्गज नेते आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी देखील उपस्थित असल्याची जोरदार चर्चा आहे. ममता बॅनर्जी दिल्लीत असतानाच त्यांच्याच पाठीमागे खासदारांचा हा गट भाजप नेत्यांच्या संपर्कात आल्यामुळे, आता बंगालमध्येही 'महाराष्ट्रासारखा' पक्ष फुटीचा खेळ रंगणार का? अशी चर्चा रंगली आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडणार की ममता बॅनर्जी हे बंड मोडून काढणार? याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
टीएमसीच्या बंडखोर खासदारांमध्ये कोणाचा समावेश आहे?
सुखेंदू शेखर
शर्मिला सरकार
जगदीश वासुनिया
कालीपदा सोरेन
प्रसून बॅनर्जी
अरूप चक्रवर्ती
टीएमसी खासदाराचा राजीनामा
सुखेंदू शेखर यांनी तृणमूल काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि राज्यसभेचा राजीनामा दिला आहे. सुखेंदू शेखर यांनी म्हटले की, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पश्चिम बंगालच्या मतदारांनी १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसवर (टीएमसी) पूर्ण अविश्वास व्यक्त केला. मतदारांनी पक्षाचा व्यापक भ्रष्टाचार, महिलांवरील तीव्र अत्याचार आणि शिक्षण, आरोग्य, उद्योग, रोजगार, तसेच कायदा व सुव्यवस्था यांसह सर्व क्षेत्रांमधील संपूर्ण अपयश आणि अराजकतेला नाकारले आहे.
बंगालच्या इतिहासात पहिल्यांदाच जनतेने भाजपला प्रचंड बहुमताने विजयी केले आहे. नव्या सरकारने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यानुसार बंगालच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पुनर्रचनासाठी कार्यक्रमांची अंमलबजावणी सुरू केली आहे. जनतेचा हा ऐतिहासिक निर्णय स्वीकारून, मी तृणमूल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, असे सुखेंदू शेखर यांनी म्हटलेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.