Mamata Banerjee helicopter emergency landing SAAM TV
देश विदेश

Mamata Banerjee News : ममता बॅनर्जींच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, नेमकं काय घडलं?

Mamata Banerjee helicopter emergency landing : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर तात्काळ लष्कराच्या हवाईतळावर उतरवण्यात आले.

Nandkumar Joshi

Mamata Banerjee helicopter emergency landing : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. ममता बॅनर्जी जलपाईगुडी येथील क्रिन्टीमधील सभेनंतर हेलिकॉप्टरने बागडोगरा येथे जात होत्या. पण मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी झाली. त्यानंतर हेलिकॉप्टर उत्तर बंगालच्या सालुगडा येथील लष्कराच्या हवाईतळावर उतरवण्यात आले.

ममता बॅनर्जी (Mamata Benerjee) या सुरक्षित आहेत, अशी माहिती तृणमूल काँग्रेस नेते राजीव बॅनर्जी यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आता रस्ते मार्गे कोलकाता येथे येणार आहेत.

भाजपवर टीकास्त्र

तत्पूर्वी, ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी जलपाईगुडी येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपला पराभवाची जाणीव झाली आहे. त्यामुळेच त्यांचे नेते विविध समाज आणि संघटनांपर्यंत पोहोचण्याचाही प्रयत्न करत नाहीत, असे त्या म्हणाल्या.

पंतप्रधान मोदींवरही साधला होता निशाणा

ममता बॅनर्जी यांनी सोमवारी अमेरिका दौऱ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. मोदी अमेरिकेला जाऊन पैसे वाया घालवत आहेत. कधी रशियाला, तर कधी अन्य देशात...इथे आपल्या लोकांना पैसे मिळत नाहीत, अशी टीका ममतांनी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Job: कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; RITES मध्ये भरती सुरु; पगार ४६०००, जाणून घ्या सविस्तर

65 वर्षे जुना कायदा बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार, खासदार अपात्रता कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्याची केंद्राची योजना

Maharashtra News Live Updates: पुणे शहरासह जिल्ह्यात आज अनेक नेत्यांच्या सभा

Shani Margi 2024: शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ; 'या' राशींसमोर संकटं येणार, आर्थिक घडी विस्कटणार

Ayushman Bharat Yojana: ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेता येणार उपचार; पाहा लिस्ट

SCROLL FOR NEXT