GOA : गोव्याच्या निवडणूकीसाठी ममता बॅनर्जी उत्सुक; तृणमूलचे नेते गोव्यात दाखल! SaamTV
देश विदेश

GOA : गोव्याच्या निवडणूकीसाठी ममता बॅनर्जी उत्सुक; तृणमूलचे नेते गोव्यात दाखल!

तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या विरोधात दंड थोपटले आहेत.

अनिल पाटील

गोवा : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ एकहाती सत्ता राबवणाऱ्या तृणमूल काँग्रेसला (TMC) गोव्यात (In GOA) आपले राजकीय भवितव्य आजमावून पाहायचा आहे. यासाठी तृणमूल काँग्रेस गोव्यात राजकीय स्पेस (Political Space) शोधत आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भारतीय जनता पार्टीच्या (BJP) विरोधात दंड थोपटले असून, सर्व देशभरच्या विधानसभा निवडणुका आणि 2024 ची लोकसभा निवडणुकीसाठी पॉलिटिकल स्पेस शोधण्याची मोहीम सुरू केली आहे. (Mamata Banerjee eager for Goa elections)

हे देखील पहा -

याचाच भाग म्हणून राज्यातील राजकीय पक्षांचे नेते, असंतुष्ट गट यांच्याशी संपर्क मोहीम सुरू केली आहे. भाजप विरोधात जनमत बनवण्याबरोबरच समविचारी पक्ष नेते यांना एकत्रित आणण्याचं काम तृणमूल काँग्रेस करणार आहे. यासाठी तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रिइन (MP Derek O'Brien) आणि प्रसून बॅनर्जी (Prasoon Banerjee) गोव्यात आले आहेत.

त्यांनी संपर्क मोहीम सुरू केली असून गोव्यातल्या अनेक राजकीय नेत्यांना सामाजिक कार्यकर्त्यांना ‘टीएमसी’मध्ये येण्याचे आवाहन करत संपर्क केला होता ही मोहीम पुढे नेण्यासाठी राजकीय विश्लेषक व राजनीतिकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांची मदत घेतली जात असून त्यांच्या ‘आयपॅक’ (Ipack) या संस्थेच्यावतीने विविध प्रकारचे सर्वेक्षण सुरू आहेत. यामध्ये राजकीय गट नेते, समाजसेवक, आर्टिस्ट, डॉक्टर यांच्याशी संपर्क मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत माजी आमदार आग्नेल फर्नांडिस, यतीन नायक, एन. शिवदास यांना संपर्क साधला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याला इतर गोवेकर किती साथ देतात हे येणारा काळच ठरवणार आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT