Shatrughan Sinha Saam Tv
देश विदेश

ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा; अभिनेते शत्रुघ्न सिन्हा लढणार पोटनिवडणूक

वृत्तसंस्था

माजी केंद्रीय मंत्री आणि प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) हे आसनसोलमधून लोकसभा पोटनिवडणुकीत (By - Election) टीएमसीचे (TMC) उमेदवार असतील अशी घोषणा खुद्द बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. त्याचवेळी बालीगंज विधानसभा जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी टीएमसीने बाबुल सुप्रियो हे उमेदवार असणार आहे. बाबुल सुप्रियो हे आसनसोल मतदारसंघातून खासदार आहेत. मात्र, त्यांनी पक्षाच्या राजीनाम्यानंतर लोकसभा सदस्यत्वाचाही राजीनामा दिला होता.

पश्चिम बंगालमध्ये एक लोकसभा आणि चार विधानसभेच्या जागांसाठी १२ एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे. यामध्ये बाबुल सुप्रियो यांच्यामुळे रिक्त झालेल्या बंगालच्या आसनसोल लोकसभेच्या जागेचाही समावेश आहे. गेल्या वर्षी बाबुल सुप्रियो यांनी आसनसोल या लोकसभा मतदारसंघातून राजीनामा दिला होता. नंतर त्यांनी भाजपला रामराम करत टीएमसीमध्ये प्रवेश केला. आता ममता बॅनर्जी बाबुल सुप्रियो यांना मोठी जबाबदारी देऊ शकतात असे बोलले जात आहे.

गोवा विधानसभा निवडणुका आणि त्रिपुरामध्ये पक्षाने बाबुल सुप्रियो यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. त्याचवेळी शत्रुघ्न सिन्हा यांनी 2019 मध्ये पटना साहिबमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, मात्र तेथे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मुलाला काँग्रेसचे तिकीट मिळाले होते. मात्र, त्यांच्या मुलाला पराभवाला सामोरे जावे लागले. सततच्या पराभवानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केला. आता आसनसोलमध्ये शत्रुघ्न सिन्हा काय कमाल करतात हे पाहावे लागणार आहे.

Edited by - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News: पोटात दुखतंय म्हणून तरुणी रुग्णालयात गेली; तपासणी करताच डॉक्टर चक्रावले, असं काय घडलं?

Navratri Fasting Benefits : नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास करताय? उपवासाचे 'हे' फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित!

Navratri Special Makeup Tricks: गरबा खेळताना मेकअप अजिबात उतरणार नाही करा या ट्रिक्स फॉलो

Marathi News Live Updates : बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, परभणीतील घटना

Shocking News : कुत्रे मागे लागताच चिमुकली प्रचंड घाबरली; जीवाच्या आकांताने पळाली, पण शेवटी मृत्यूने गाठलंच

SCROLL FOR NEXT