पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी चार उमेदवारांची घोषणा केली आहे. या नावांमुळे तृणमूल काँग्रेसची संख्या १७ पर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या यादीमध्ये बाबुल सुप्रियो, राजीव कुमार, मनेका गोस्वामी आणि अभिनेत्री कोएल मलिक यांचा समावेश आहे. सामाजिक आणि राजकीय संतुलन एक करून याकडे रणनीती म्हणून पाहिले जात आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) नेत्या ममता बॅनर्जी यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी चार उमेदवारांची घोषणा केली आहे. डॉ. बाबुल सुप्रियो, राजीव कुमार, मनेका गोस्वामी आणि अभिनेत्री कोयल मल्लिक तृणमूल काँग्रेस राज्यसभेच्या जाऊन देशाच्या राजकरणार सक्रिय होत आहे. या निमित्ताने असा प्रश्न उद्भवतो की ममता बॅनर्जी यांनी हे उमेदवार का निवडले? ते फक्त राज्यसभेचे सदस्य बनून पक्षाचा मत वाढवण्याचे साधन आहेत की यामागे काही राजकीय खेळी आहे?
देशाच्या राजकारणात राज्यसभेच्या जागांना मोठे महत्व आहे. या खासदारांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. यामुळे केंद्रामध्ये आपल्या पक्षाची मोठी प्रतिमा देखील तयार होते. तृणमूल काँग्रेसकडे सध्या राज्यसभेच्या १३ जागा आहेत आणि या चार नवीन जागांची भर पडल्याने त्यांची संख्या १७ होईल, ज्यामुळे पक्षाची राजकीय ताकद वाढणार आहे.
ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या निवडणूक रणनीतीचा भाग म्हणून सर्व नावे वेगवेगळ्या प्रदेशांशी, वर्गांशी आणि ओळखींशी जोडली आहेत. भाजपचे माजी नेते डॉ. बाबुल सुप्रियो यांना समाविष्ट करून, ममतांनी केवळ त्यांच्या विधानसभा जागा मजबूत केल्या नाहीत तर काही भाजप कट्टरपंथी नेत्यांना त्यांच्या पक्षात आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. राजीव कुमार आणि मनेका गोस्वामी सारखी नावे पक्षाच्या अनुभवी आणि सर्वच धर्मांना आकर्षित करणारे हे चेहरे आहे तर कोयल मलिक सारखी तरुण आणि लोकप्रिय अभिनेत्री व्यक्ती पक्षात नवीन ऊर्जा आणि ओळख निर्माण करेल. असा विश्वास मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.