Mallikarjun Kharge
Mallikarjun Kharge  Saam Tv
देश विदेश

Mallikarjun Kharge Security: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना झेड प्लस सुरक्षा, 58 कमांडोच्या 24 तास राहणार सोबत

Satish Kengar

Mallikarjun Kharge Security:

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना निमलष्करी दलाकडून झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.

सीआरपीएफची ही झेड प्लस श्रेणी सुरक्षा व्यवस्था इंटेलिजन्स ब्युरोच्या थ्रेट पर्सेप्शन रिपोर्टच्या आधारे काँग्रेस अध्यक्षांना प्रदान करण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मल्लिकार्जुन खरगे यांना एकूण 58 सीआरपीएफ कमांडो 24 तास सुरक्षा पुरवतील. काँग्रेस अध्यक्षांना देशभरात झेड प्लस श्रेणीची सुरक्षा देण्यात येणार आहे. खरगे यांच्या जीवाला धोका असल्याची भीती आयबीने व्यक्त केली होती. लोकसभा निवडणुकाही जवळ आल्या आहेत. अशातच त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

झेड-प्लस सुरक्षा म्हणजे काय?

एसपीजी कव्हरनंतर झेड-प्लस सुरक्षा ही सर्वोच्च सुरक्षा आहे. या सुरक्षा कव्हरेजमध्ये सीआरपीएफ कमांडोसह 55 जवान आहेत, जे 24 तास सुरक्षा प्रदान करतात. सुरक्षा कवचमध्ये बुलेटप्रूफ वाहन आणि तीन शिफ्ट एस्कॉर्टचाही समावेश आहे.

नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) कमांडोद्वारे झेड-प्लस स्तरावरील सुरक्षा पुरविली जाते. त्यांच्याकडे हेकलर आणि कोच MP5 सब-मशीन गन आणि आधुनिक संचार उपकरणे आहेत. या टीममध्ये प्रत्येक जवान मार्शल आर्ट्स आणि नि:शस्त्र लढाऊ कौशल्यांमध्ये पारंगत आहे. सध्या 40 व्हीआयपींना अशी सुरक्षा पुरविली जाते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Eyes: नजर चांगली ठेवण्यासाठी 'या' ५ गोष्टींनी डोळे ठेवा निरोगी

Guru Gochar: 12 वर्षांनंतर रोहिणी नक्षत्रात गुरू, या 3 राशींचे नशीब सूर्यासारखे चमकेल

Dual-Screen Laptop: जगातील पहिला ड्युअल स्क्रीन लॅपटॉप लॉन्च, Acemagic X1 चे फीचर्स जाणून थक्क व्हाल

Mumbai Local Train: मुंबईत पावसाचा कहर! सीएसएमटी ते मानखुर्द हार्बर लोकल सेवा बंद; नागरिकांचे हाल

Weight Gain Tips: वजन वाढवायचंय? 'या' गोष्टी करुन 30 दिवसात व्हा 'वजनदार' माणूस

SCROLL FOR NEXT