Mallikarjun Kharge: नरेंद्र मोदींनंतर राहुल गांधीच देशाचे पंतप्रधान होतील, मल्लिकार्जुन खर्गेचे मोठं विधान
Rahul Gandhi And Mallikarjun Kharge Saam Tv
देश विदेश

Mallikarjun Kharge: नरेंद्र मोदींनंतर राहुल गांधीच देशाचे पंतप्रधान होतील, मल्लिकार्जुन खरगेंचे मोठं विधान

Priya More

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी राहुल गांधींबाबत (Rahul Gandhi) मोठं विधान केले आहे. या निवडणुकीत इंडिया आघाडीने (India Aghadi) जर भाजपचा (BJP) पराभव केला तर नरेंद्र मोदी यांच्यानंतर राहुल गांधीच देशाचे पंतप्रधान होतील. मल्लिकार्जुन खरगे यांनी मागच्या आठवड्यामध्ये इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देणे टाळले होते. हा प्रश्न 'कौन बनेगा करोडपती' सारखा असल्याचे त्यांनी म्हटले होते. पण आता त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले की, 'राहुल गांधींना पंतप्रधानपदासाठी माझी पसंती आहे. तर प्रियंका गांधींनी निवडणूक लढवायला हवी होती. प्रियंका गांधी वाड्रा यांनी निवडणूक लढवावी यासाठी मी जोर दिला होता. रायबरेलीतून त्यांनी निवडणूक लढवावी अशी चर्चा होती. याच मतदारसंघातून सोनिया गांधी ५ वेळा जिंकल्या होत्या. पण प्रियंका गांधी वाड्रा यांनी निवडणूक लढवण्यासाठी निकार दिला. त्यामुळे त्यांच्याऐवजी या मतदारसंघामध्ये राहुल गांधी निवडणूक लढवण्यासाठी उभे राहिले.'

तसंच, 'राहुल गांधी यांनी निवडणुकीआधी दोन वेळा भारत जोडो यात्रेचे नेतृत्व केले होते. त्याचसोबत त्यांनी निवडणुकीच्या दरम्यान जोरदार प्रचार देखील केला होता. नेहमी त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी माझी पसंती आहेत. ते तरुण पिढी आणि संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधी यांना सर्वोच्च पदासाठी एक वास्तववादी सर्वसंमतीचे उमेदवार म्हणून पाहिले जाते.' , असे देखील मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले.

मागच्या महिन्यामध्ये मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले होते की, 'इंडिया आघाडीने निर्णय घेतला आहे की आम्ही एकत्र निवडणूक लढत आहोत. त्यामुळे निवडणूक जिंकल्यानंतर इंडिया आघाडी संयुक्तपणे निर्णय घेईल की पंतप्रधान कोण होईल.' तसंच, मागच्या आठवड्यामध्ये खरगे यांनी पंतप्रधानपदाच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देणे टाळले होते. शिमल्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पंतप्रधानपदाचा प्रश्न म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' सारखा आहे असे म्हटले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Wari 2024: संत सोपानकाकांची पालखी विठुरायाच्या दिशेने मार्गस्थ!

Bhushi Dam Incident: भुशी धरण दुर्घटना दुर्दैवी, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत; राज्य सरकारची घोषणा

Bhandara: दुर्देवी घटना! झेडपी शाळेत शॉक लागून विद्यार्थिनीचा मृत्यू

Maharashtra Live News Updates : धाराशिव शहरासह परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग

Oversleeping Effects: जास्तवेळ झोपणं आरोग्यासाठी घातक; जाणून घ्या दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT