kota building collapse Saam tv
देश विदेश

मोठी बातमी! इमारत कोसळून ५ जणांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अनेक जण दबल्याची शक्यता

kota building collapse : कोटा शहरात इमारत कोसळून ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण दबल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Vishal Gangurde

राजस्थानमध्ये घडली इमारत कोसळण्याची दुर्घटना

दुर्घटनेत आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

इमारतीच्या ढिगाऱ्याखाली लोक अडकले असण्याची शक्यता

राजस्थानच्या कोटा शहरात मोठी दुर्घटना घडली आहे.जवाहर नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेली एक इमारत अचानक कोसळल्याची घटना घडली आहे. इमारत कोसळून आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. इमारत कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोटा शहरात रात्री ८.४५ वाजताच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. दोन निर्माणाधीन इमारत कोसळल्याची घटना घडली. इमारत कोळल्याने आजूबाजूच्या परिसरात राहणार्‍या लोकांची धावाधाव झाली. काही स्थानिकांनी तातडीने इमारतीच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्नीशमन दलाचे जवानांनी मदत कार्य सुरू केले आहे.

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारत कोसळल्यानंतर तब्बल दीड तासांनी पोलिसांनी मदतीसाठी धाव घेतली आहे. यामुळे दुर्घटनेत जखमी झालेल्यांना उशिराने मदत मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी संपूर्ण परिसराला घेरलं आहे.

कोटा शहरात घडलेल्या घटनेवर राजस्थानचे मंत्री मदन दिलावर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, 'ही दुर्दैवी घटना घडली आहे. मी याबाबतीत प्रशासनाशी बोललो आहे. मला या घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. यातील ५-७ जणांना सुरक्षित वाचवण्यात यश आलं आहे. इमारत दुर्घटनेत जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT