राजदचे वरिष्ठ नेते अनिसुर रहमान यांनी ऐन निवडणुकीत राजीनामा
पक्षातील मनमानी आणि तिकीट वाटपातील अन्यायामुळे अनिसुर यांचा निर्णय
अनिसुर यांचा मुस्लिम आणि यादव समाजावर मोठा प्रभाव
पक्षात विचारधारा नाही, तर केवळ व्यापाराचं वातावरण, अशी टीका त्यांनी केली
बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीआधीच माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला मोठा झटका धक्का बसला आहे. राजदचे वरिष्ठ नेते आणि मधुबनी जिल्हा प्रभारी अनिसुर रहमान यांनी मंगळवारी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. पक्षातील मनमानीला कंटाळून अनिसुर रहमान यांनी राजीनामा दिला आहे. अनिसुर रहमान यांच्या राजीनाम्यामुळे पक्षातील तिकीट वाटपावरील नाराजी उघड झाली आहे.
अनिसुर रहमान यांनी लिहिलेल्या राजीनामा पत्रात म्हटलं की, 'पक्षात ग्राऊंड लेव्हलला काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार केला जात नाही. ज्या लोकांनी पक्षासाठी अनेक वर्ष घाम गाळला. त्यांना बाजूला सारलं पाहिजे. पक्षातील मोजक्या लोकांकडून महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. पक्षातील मोजके लोक हे स्वार्थ पाहून काम करत आहे'.
'तिकीट वाटपादरम्यान मतदारसंघातील स्थानिक कार्यकर्त्यांना विचारात घेतलं जात नाहीए. पक्षात विचारधारा नाही, तर व्यापाराचं वातावरण झालं आहे, असेही ते म्हणाले.
ऐन निवडणुकीत वरिष्ठ नेते अनिसुर यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याने राष्ट्रीय जनता दलाला मोठी डोकेदुखी ठरू शकते. अनिसुर रहमान यांचा मुस्लिम आणि यादव समाजाच्या मतांवर चांगला प्रभाव आहे. पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार, अनिसुर रहमान हे मागील काही दिवसांपासून पटना येथे पक्षातील वरिष्ठांशी चर्चा करण्यासाठी प्रयत्न करत होते. परंतु त्यांची भेट झाली नाही. मात्र, अनिसुर यांच्या राजीनाम्यामुळे बिहारमधील राजकारण खळबळ उडाली आहे.
अनिसुर हे दरभंगाच्या केवटी विधानसभा मतदारसंघातून लढण्याची शक्यता आहे. त्यांनी या मतदारसंघातून राजकीय भेटीगाठी सुरु केल्या आहेत. त्यांनी जनसंपर्क वाढवण्यासही सुरुवात केली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत त्यांची राजकीय दिशा स्पष्ट होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.