tamil nadu news Saam tv
देश विदेश

राजकारणात मोठी उलथापालथ; माजी मंत्र्यांसहित ३०० हून अधिक नेत्यांचा सत्ताधारी पक्षात प्रवेश

AIADMK leader join tvk : तामिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. माजी मंत्र्यांसहित ३०० हून अधिक नेत्यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला आहे.

Saam Tv

तामिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ

तामिळनाडूत ३०० हून अधिक नेत्याचा टीव्हीके पक्षात प्रवेश

माजी मंत्र्याच्या पक्षप्रवेशामुळे तामिळनाडूतील राजकारण ढवळून निघालं

तामिळनाडूमध्ये 'एआयएडीएमके' (AIADMK) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षातील माजी मंत्र्यांसह ३०० हून अधिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी 'टीव्हीके' (TVK) पक्षात प्रवेश केला आहे. या मोठ्या पक्ष बदलामुळे तामिळनाडूमधील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघालं आहे.

AIADMK चे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री उदुमलाई राधाकृष्णन यांनी सांगितले की, त्रिचीचे वरिष्ठ नेते एन. आर. शिवपती, कदंबुर राजू, एम. सी. संपत, पन्नीरसेल्वम, गोविंदासामी आणि कोलाथुर कृष्णमूर्ती या प्रमुख नेत्यांनी सत्ताधारी TVK पक्षात प्रवेश केला आहे.

राधाकृष्णन पुढे म्हणाले की, "आम्ही गेली ५ वर्षे AIADMK पक्षात होतो, ज्या दरम्यान आम्हाला अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. मुख्यमंत्री विजय हे एम. जी. रामचंद्रन आणि जयललिता यांना आपले आदर्श मानतात. म्हणूनच आम्ही TVK पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला."

पक्षप्रवेश सोहळ्यात उपस्थितांना संबोधित मंत्री सेंगोत्तैयान यांनी म्हटलं की, तामिळनाडूच्या जनतेला बदल हवा होता. त्यांनी बदलासाठी मतदान केलं. त्यांनी मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. भारताच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा केवळ दोन वर्ष जुन्या पक्षाला मोठ्या प्रमाणात यश मिळालं. तामिळनाडूच्या जनतेने स्वच्छ आणि पारदर्शी प्रशासनाची निवड केली आहे. मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वात टीव्हीके राज्यातील राजकारणाला नवी दिशा देत आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अनधिकृत बॅनर्सवर ठाण्यात बुलडोझर! 8 दिवसांत 1524 अनधिकृत होर्डिंग्ज हटवले

राहुल गांधींच्या नाकातून निघालं रक्त; पोलिसांनी उचलताना नाकाला दुखापत झाल्याचा आरोप

Maharashtra News Live Update: परभणीत मध्यरात्री धक्कादायक घटना; आलिशान कारमधून येत मोकाट गायीची चोरी

Hair Care: पावसाळ्यात फ्रिझी केसांपासून मिळवा सुटका; फॉलो करा या ५ सोप्या हेअर केअर टिप्स

हातात बेड्या अन् प्रचंड राग...पंतप्रधानांच्या घराबाहेर राहुल गांधींनी केलेल्या आंदोलनाची दृश्ये, पाहा PHOTO

SCROLL FOR NEXT