Prime Minister Narendra Modi news  Saam tv
देश विदेश

PM मोदींच्या कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल होणार? चर्चेची लाट कुठून आली, 21 तारखेचं कनेक्शन काय?

Narendra modi news : PM मोदींच्या कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Vishal Gangurde

निवडणुकीनंतर केंद्र सरकारमध्ये फेरबदल होण्याची चर्चा

केंद्राच्या २१ मे रोजीच्या बैठीकमुळे चर्चांना उधाण

आगामी निवडणुकीसाठी योजना आखण्याची शक्यता

पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आता भाजप आणि केंद्र सरकारमध्ये मोठे फेरबदल होण्याची जोरदार चर्चा होत आहे. भाजपचे नवीन राष्ट्राध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडून नव्या टीमची घोषणा झाल्यानंतर सरकारमध्ये बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

केंद्रात स्वबळावर बहुमत मिळवण्यात अपयश आल्यानंतर भाजपने जनता दल आणि तेलुगू देशम पार्टी यांच्या पाठिंब्यावर सरकारची स्थापना केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांसोबत अतिरिक्त मंत्रिपद देण्याविषयी कोणताही चर्चा सुरू झालेली नाही. तर ९ जून २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या कार्यकाळात केंद्रीय मंत्रिमंडळात कोणतेही फेरबदल झालेले नाही. त्यामुळे मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

२१ मेच्या बैठकीने घडामोडींना वेग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली २१ मे २०२६ रोजी मंत्रिमंडळाची बैठक आहे. याचदरम्यान एका सरकारी अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवरून मंत्रिमंडळाच्या बैठका नियमित अंतराने होत असतात. देश सध्या पश्चिम आशियातील तणावजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देत आहे. याकाळात मंत्रिमंडळाची बैठक होणे साधी बाब नाही'.

भाजप नेत्यांच्या माहितीनुसार, संघटनात्मक बदल हे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण मानले जातात. पक्ष २०२७ च्या विधानसभा निवडणुका, राष्ट्रपती निवडणूक आणि २०२९ सालच्या लोकसभा निवडणुकांची पायाभरणी करत आहे.

पक्षातील काही वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री, प्रदेशाध्यक्ष सारख्या पदावर काम करणाऱ्या नेत्यांना संघटन मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील टीममध्ये सहभागी केले जाऊ शकते. पुढील वर्षी उत्तर प्रदेश आणि पंजाब राज्यात निवडणुका होणार आहेत. आगामी निवडणुकीसाठी एखादे नेतृत्व आणि अचूक नियोजनाची आवश्यकता भासणार आहे.

२०२७ साली भाजपला उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये निवडणुकीला सामोरे जावे लागू शकते. यातील पाच राज्यात भाजप आधीच सत्तेत आहे. तर भाजप पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलासोबत युती तोडल्यानंतर आम आदमी पक्षाशी थेट लढाई करण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात मेड इन पाकिस्तानचा शिरकाव, चिंचवडच्या यात्रेत पाकिस्तानी चादर

Crime News: पुणे हादरले! दिवसाढवळ्या शेतकऱ्यासह तिघांवर जीवघेणा हल्ला, दगड-लाठीकाठीने मारहाण अन् कोयत्याने हल्ला

कॉलेज-कोचिंगचं साटलोटं, विद्यार्थ्यांची लूट, पुण्यात 'इंटिग्रेटेड'च्या नावाखाली काळाबाजार

Jalgaon Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! जळगावमध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक, चौघांचा जागीच मृत्यू

भाजपमध्ये मोठी फूट, प्रदेशाध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष आणि सचिवांचा तडकाफडकी राजीनामा; देशाच्या राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT