Warehouse Roof Collapses During Construction Saam Tv
देश विदेश

Kolkata: भयंकर! निर्माणाधीन गोदामाचे छत कोसळले, ४० पेक्षा अधिक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले

Warehouse Roof Collapses During Construction: कोलकातामध्ये भयंकर घटना घडली. बांधकाम सुरू असलेल्या गोदामाचे छत अचानक कोसळले. या घटनेत ४० जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.

Priya More
  • कोलकात्यात बांधकाम सुरू असलेल्या गोदामाचे छत कोसळले

  • ४० हून अधिक कामगार अडकल्याची भीती

  • आतापर्यंत १३ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश

  • बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

पश्चिम बंगालमध्ये आज मोठी दुर्घटना घडली. कोलकाता येथील तारातालामध्ये बांधकाम सुरू असलेल्या एका गोदामाचे छत अचानक कोसळले. ढिगाऱ्याखाली ४० हून अधिक कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. गोदामाच्या पहिल्या मजल्यावर छताचे बांधकाम सुरू होते. त्यावेळी एक लोखंडी सांगाडा अचानक कोसळला आणि मोठी दुर्घटना घडली. आतापर्यंत १३ जणांना वाचवण्यात यश आले आहे.

गोदामाचे छत कोसळल्यानंतर एकच गोंधळ उडाला. किंचाळ्यांनी संपूर्ण परिसर हादरून गेला. तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. ढिगाऱ्याखाली किती जण अडकले आहेत हे अद्याप समजू शकले नाही. ४० हून अधिक जण त्याठिकाणी काम करत होते. त्यामुळे ते सर्वजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. लष्कराचे जवान आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्यात सुरू आहे. ढिगाऱ्याखालून कामगारांना बाहेर काढण्यासाठी गॅस कटरच्या साहाय्याने लोखंडी सांगाडा कापण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा छत अचानक कोसळले तेव्हा अनेक कामगार इमारतीच्या आत काम करत होते. मोठे लोखंडी बीम आणि काँक्रीटचा मलबा कामगारांच्या अंगावर पडला आणि ते त्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यामुळे या घटनेत मृतांचा आकडा मोठा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

अपघातानंतरच्या परिस्थितीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती फोनवर बोलताना ऐकू येते की, 'सर, कृपया कोणालातरी लवकर पाठवा. अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. अनेकांचा मृत्यू झाला आहे.' या घटनेच्या व्हायरल व्हिडिओमध्ये मोठे लोखंडी बीम आणि काँक्रीटचा मलबा विखुरलेला दिसत आहे. पश्चिम बंगालचे मंत्री डॉ. इंद्रनील खान घटनास्थळी दाखल झाले आहेत.

या अपघातासंदर्भात इंद्रनील खान यांनी सांगितले की, 'आत अडकलेल्यांना बाहेर काढणे हे आमचे प्राधान्य आहे. सर्व बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. हे सर्व बेकायदेशीर असून टीएमसी सत्तेत असताना याचे बांधकाम करण्यात आले होते. ताराताला येथील बांधकाम सुरू असलेल्या गोदामाचे छत कोसळलेल्या ठिकाणी पश्चिम बंगाल पोलिसांचे आपत्ती व्यवस्थापन पथक उपस्थित आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवण्यासाठी आणखी पथके बोलावण्यात येत आहेत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सकाळी चहाऐवजी प्या हळदीचे पाणी, शरीरात होतील 'हे' 5 मोठे बदल!

Maharashtra News Live Update: पुणे: हिंजवडी आयटी पार्क परिसरातील 'मेगापोलिस' सोसायटीत भीषण आग; ८ व्या मजल्यावरील फ्लॅट जळून खाक

Maharashtra tourism: मुंबईपासून फक्त २२६ किमी दूर आहे हे हिल स्टेशन; पाहा फिरण्याचा A टू Z प्लान

Shocking : कल्याण हादरलं! ७ वर्षाच्या मुलीवर ५५ वर्षाच्या नराधमांकडून बलात्कार

Beed Crime: खासदार बजरंग सोनवणे यांच्या अडचणीत वाढ, बीडच्या विलास घुले हत्या प्रकरणात मुलाचं नाव

SCROLL FOR NEXT