Sharad Pawar and Parth Pawar amid rising speculation over a possible joint Rajya Sabha bid from Maharashtra Saam Tv
देश विदेश

Sharad Pawar : राज्यसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, नातू-आजोबा एकाच वेळी राज्यसभेवर जाणार?

Sharad Pawar And Parth Pawar: राज्यसभा निवडणूक जाहीर झालीय.. मात्र ही निवडणूक महाराष्ट्रासाठी विशेष ठरणार आहे...कारण आजोबा आणि नातू सोबतच राज्यसभेवर जाण्यासाठी फिल्डिंग लावली जातेय.. मात्र हे समीकरण नेमकं कसं असू शकतं ? राज्यसभेचा कोटा पूर्ण करण्यासाठी आकड्यांचा खेळ कसा होऊ शकतो ?

Bharat Mohalkar

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली... त्यामुळे आता त्यांना राज्यसभेच्या खासदारपदाचा राजीनामा द्यावा लागणार आणि त्यासाठी पोटनिवडणूक होणार हे जवळपास निश्चित झालंय.. तर दुसरीकडे शरद पवारांसह राज्यातील 7 राज्यसभेचे खासदारांची 9 एप्रिलला टर्म संपतेय... त्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय... याच पार्श्वभुमीवर चर्चा रंगलीय ती राज्यसभेत आजोबा आणि नातू एकाच वेळी जाण्याची... होय... पार्थ पवार आणि शरद पवार एकाच वेळी राज्यसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे.... कारण पवारांना पुन्हा राज्यसभेवर निवडून देण्यासाठी महाविकास आघाडीनं फिल्डिंग लावलीय..

मात्र राज्यसभेवर एकाच वेळी पार्थ पवार आणि शरद पवार यांना निवडून देण्यासाठी कशी रणनीती आखली जाऊ शकते...महाराष्ट्र विधानसभेत 288 जागा आहेत... मात्र अजित पवारांच्या निधनामुळे सध्या विधानसभेत 287 आमदार आहेत... त्यामुळे विजयासाठी 41 आमदारांच्या पहिल्या पसंतीच्या मतांची गरज आहे...सध्या महाविकास आघाडीकडे 46 आमदारांचं संख्याबळ आहे. या संख्याबळांच्या आधारावर पवारांचा विजय निश्चित मानला जातोय..

दुसरीकडे दादांच्या राष्ट्रवादीकडे 40 आमदारांचं संख्याबळ आहे... त्यामुळे पार्थ पवारांना काठावर विजय मिळू शकतो. तर शिंदेसेनेलाही 1 जागा मिळू शकते... मात्र पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचे आरोप करणाऱ्या भाजपने पाचवा उमेदवार रिंगणात उतरवून दादांच्या राष्ट्रवादीची मतं आपल्याकडे खेचण्याची खेळी केली तर पार्थ पवारांची अडचण होऊ शकते....त्यामुळेच सुनेत्रा पवारांची रिक्त होणारी जागा सुरक्षित पर्याय म्हणून मागे ठेवण्यात आल्याची चर्चा आहे..

आधीच खारगे समितीच्या अहवालात पार्थ पवारांना अभय मिळल्यामुळे त्यांचा राज्यसभेचा मार्ग मोकळा झाल्याचं म्हटलं जातंय... तर शरद पवारांसाठी काँग्रेस आणि ठाकरेसेना सकारात्मक आहे... त्यामुळे पवार नातू आणि आजोबा सोबतच राज्यसभेवर जाणार का याचीच उत्सुकता लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Office Makeup Tips: ऑफिससाठी परफेक्ट आणि सिम्पल मेकअप हवा असेल तर या सोप्या ७ टिप्स नक्की फॉलो करा

मुंबईत अर्धनग्न अवस्थेत नशा, ड्रग्ज पार्टीचे 'कल्याण कनेक्शन'; नेस्कोमधील धक्कादायक व्हिडिओ समोर

Maharashtra Live News Update : नेक्सो सेंटरमधील ड्रग्स पार्टीच्या प्रकरणात एकाला अटक

Nail Colours Designs: उन्हाळ्यात नखांचे सौंदर्य वाढवतील 'हे' 5 नेल कलर्स

Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला बनणार ५ राजयोग; या राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार

SCROLL FOR NEXT