Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला बनणार ५ राजयोग; या राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार

Surabhi Jayashree Jagdish

अक्षय तृतीया

अक्षय्य तृतीयेचा यंदा 19 एप्रिल रोजी साजरा केली जाणार आहे. या दिवशी कोणत्याही शुभ कामासाठी वेगळा मुहूर्त पाहण्याची गरज नसते. या दिवशी केलेले दान, पूजा, गुंतवणूक किंवा चांगलं कार्य याचं फळ चांगलं मिळतं.

विशेष योग

यंदा या दिवशी गुरु आणि चंद्र एकाच राशीत असणार आहेत. ज्यामुळे गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. याशिवाय त्रिपुष्कर राजयोग, आयुष्मान राजयोग, मालव्य राजयोग आणि शश राजयोग असे अनेक शुभ योगही यावेळी जुळून येणार आहेत.

मेष राशी

मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. नोकरी किंवा करिअरमध्येही सकारात्मक बदल दिसू शकतात.

वृषभ राशी

वृषभ राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत दिलासा मिळू शकतो. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करणाऱ्यांना फायदा होऊ शकतो.

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ आनंददायी ठरू शकतो. एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. बराच काळ अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ आरामदायी आणि सकारात्मक ठरू शकतो. घरात आनंदाचे वातावरण राहील. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.

मीन राशी

मीन राशीच्या लोकांसाठी अपूर्ण कामे पूर्ण होण्याचे संकेत आहेत. मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत वाटेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन काम सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ योग्य दिशा देणारा ठरू शकतो.

Chhatrapati Shivaji Maharaj history: अफजलखानाचा वध केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापुरी सैन्यासोबत काय केलं?

Shivaji Maharaj history
येथे क्लिक करा