Delhi High Court issues summons to Uddhav Thackeray saam tv
देश विदेश

Maharashtra Politics: '५० खोके एकदम ओक्के' हे वक्तव्य तात्काळ सोशल मीडियातून काढून टाका, दिल्ली हायकोर्टाचे आदेश

Maharashtra Political News : राज्याच्या राजकारणातील आत्ताची मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाला दिल्ली हायकोर्टाने मोठा धक्का दिला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Delhi High Court issues summons to Uddhav Thackeray: राज्याच्या राजकारणातील आत्ताची मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाला दिल्ली हायकोर्टाने मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेच्या आमदारांविरोधात केलेले “५० खोके एकदम ओक्के” हे वक्तव्य तात्काळ सोशल मीडियातून काढून टाका, असे आदेश दिल्ली हायकोर्टाने दिले आहेत.

तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांना कोर्टात हजर राहण्याचे दिले आदेश दिल्ली हायकोर्टाने दिले आहेत.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेचे नेते राहुल रमेश शेवाळे यांनी दाखल केलेल्या दिवाणी मानहानीच्या दाव्यात दिल्ली उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना समन्स बजावले आहे. या खटल्यात न्यायालयाने संजय राऊत यांनाही समन्स बजावले आहे.

शिवसेनेचे चिन्ह 2000 कोटी रुपयांना विकत घेतल्याच्या विधानावरून शिवसेनेचे नेते राहुल शेवाळेयांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर खटला भरला आहे. या प्रकरणावरील पुढील सुनावणी 17 एप्रिल रोजी होणार आहे. (Latest Political News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भोंदू अशोक खरात आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात ठाकरेंच्या युवसेनेकडून निषेध आंदोलन

गोंदियात शासकीय नर्सिंग कॉलेजच्या 45 विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा

Buldhana : पोस्टात बॉम्बची धमकी, स्फोटानं उडवून देणार असल्याचा मेल आल्यानं प्रशासनात खळबळ

Matka Kulfi Recipe : उन्हाळ्यात घरीच बनवा थंडगार मटका कुल्फी, गारेगार Kulfi खाऊन आठवेल बालपण

Blouse Designs: उन्हाळ्यात घाला हे 5 स्टायलिश ब्लाऊज, दिसाल एकदम कूल

SCROLL FOR NEXT